लॅपटॉप सध्याच्या काळात कामासाठी खूपच महत्त्वाचा झाला आहे. वर्क फ्रॉम होम असो अथवा कॉलेज, लॅपटॉप गरजेचा झाला आहे. करोना व्हायरस माहमारीमुळे घरून काम करण्याचे प्रमाण वाढले आहे. तसेच, शाळा-कॉलेजचे क्लासेस देखील ऑनलाइनच सुरू आहेत. अशा स्थितीमध्ये घरात लॅपटॉप असायलाच हवा. गेल्या काही दिवसात लॅपटॉप्सची मागणी देखील प्रचंड वाढल्याचे पाहायला मिळत आहे. तुम्ही जर नवीन लॅपटॉप खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आम्ही तुम्हाला बाजारात उपलब्ध काही चांगल्या लॅपटॉप्सबद्दल माहिती देत आहोत. तुमचे बजेट जर ४० हजार रुपयांपेक्षा कमी असल्यास या किंमतीत तुम्हाला Dell Vostro 3401, Acer Aspire 3, HP 255 G8, Avita Liber V14 आणि Lenovo V14 सारखे शानदार लॅपटॉप्स मिळतील. या टॉप-५ लॅपटॉप्सच्या किंमती आणि फीचर्सविषयी सविस्तर जाणून घेऊया.

Dell Vostro 3401
या लॅपटॉपमध्ये १४.० इंच FHD अँटी ग्लेयर LED बॅकलिट डिस्प्ले देण्यात आला असून, याचे रिझॉल्यूशन १०८०x१९२० पिक्सल आहे. यात ११th जनरेशन Intel Core i३-१११५G४ प्रोसेसर देण्यात आला आहे. यामध्ये ८ जीबी रॅम आणि १TB SATA हार्ड ड्राइव्ह देण्यात आली आहे. लॅपटॉपमध्ये Intel UHD ग्राफिक्स मिळेल. तसेच, हा लॅपटॉप Windows १० Home वर काम करतो. ई-कॉमर्स साइट Amazon वरून लॅपटॉपला ३९,८४८ रुपयात खरेदी करू शकता.
Acer Aspire 3
Acer Laptop मध्ये १५.६ इंच FHD IPS डिस्प्ले देण्यात आला असून, याचे रिझॉल्यूशन १०८०x१९२० पिक्सल आहे. यात ११th जनरेशन Intel Core i३-१११५G४ प्रोसेसर मिळेल. लॅपटॉपमध्ये ४ जीबी रॅम आणि २५६ जीबी एसएसडी देण्यात आली आहे. याशिवाय ComfyView एलईडी-बॅकलिट TFT LCD मिळेल. लॅपटॉपमध्ये Intel UHD ग्राफिक्स देण्यात आले आहे. यातील बॅटरी एकदा र्ज केल्यानंतर ८ तास टिकते. यामध्ये बिल्ट-इन स्टीरियो स्पीकर्स देखील मिळेल. Windows १० Home वर काम करणाऱ्या या लॅपटॉपला Amazon वरून तुम्ही ३८,९९० रुपयात खरेदी करू शकता.
HP 255 G8
या लॅपटॉपमध्ये १५.६ इंच FHD डिस्प्ले देण्यात आला असून, याचे रिझॉल्यूशन १०८०x१९२० पिक्सल आहे. यामध्ये AMD Ryzen ३ ३३०० प्रोसेसर देण्यात आला आहे. लॅपटॉपमध्ये ४ जीबी रॅम आणि ५१२ जीबी एसएसडी देण्यात आले असून, १० तासांचा बॅटरी बॅकअप देखील मिळेल. कनेक्टिव्हिटीसाठी यात USB ३.०, टाइप सी पोर्ट, यूएसबी २.० पोर्ट आणि वायफाय ८०२.११ax दिले आहे. एचपीचा हा लॅपटॉप ३९,९०० रुपयात उपलब्ध आहे.
Avita Liber V14
या लॅपटॉपमध्ये १४ इंचाचा FHD डिस्प्ले मिळेल. याचे रिझॉल्यूशन १०८०x१९२० पिक्सल आहे. यात Ryzen ५ ३५००U प्रोसेसर देण्यात आला आहे. Avita Liber V14 मध्ये ८ जीबी रॅम आणि ५१ २ जीबी एसएसडी मिळेल. यात बिल्ट-इन स्टीरियो स्पीकर आणि ड्यूल मायक्रोफोन देण्यात आला आहे. यामध्ये बॅकलिट TFT IPS पॅनल दिला आहे. याची बॅटरी एकदा चार्ज केल्यावर १० तास टिकते. कनेक्टिव्हिटीसाठी यामध्ये मायक्रोएसडी कार्ड रीडर, USB ३.०, USB २.०, USB ३.० Type C आणि Micro HDMI पोर्ट दिले आहे. फ्लिपकार्टवर हा लॅपटॉप ३८,९९० रुपयात उपलब्ध आहे.
Lenovo V14
Lenovo V14 लॅपटॉपमध्ये १४ इंच HD डिस्प्ले देण्यात आलेला आहे. यात Intel Core i3 CPU प्रोसेसर आणि intel Integrated UHD GPU मिळेल. लॅपटॉपमध्ये ४ जीबी रॅम आणि १ टीबी एचडीडी देण्यात आली आहे. तसेच, स्टीरियो ऑडिओसाठी दोन १.५W स्पीकर्स मिळेल. कनेक्टिव्हिटीसाठी यात वाय-फाय ८०२.११ac, ब्लूटूथ, USB ३.०, USB २.० आणि HDMI पोर्ट दिले आहे. याची बॅटरी एकदा चार्ज केल्यावर ५ तास टिकते. लॅपटॉप Amazon वर ३६,९९० रुपयात उपलब्ध आहे.
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3kC0FqK