सध्या स्मार्टफोन्समध्ये रोजच नव- नवीन मॉडेल्सची एन्ट्री होत आहे. भारतीय बाजारपेठेत, देश आणि जगातील सुप्रसिद्ध स्मार्टफोन निर्माते एकापेक्षा जास्त स्मार्टफोन ऑफर करत राहतात. जर तुम्ही तुमच्यासाठी नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आम्ही तुम्हाला काही उत्तम स्मार्टफोनची माहिती देत आहोत. आज आम्ही तुम्हाला सप्टेंबरमध्ये बाजारात येणाऱ्या काही जबरदस्त स्मार्टफोनची माहिती देत आहोत. जे JioPhone Next, Asus Z8, MicroMax In Note 1 Pro, Redmi 10 Prime, iPhone 13 Series, iQOO 8 Series, Samsung Galaxy S21 FE आहेत. Samsung Galaxy A52, Vivo 70 Series आणि itel Vision Series. पाहा कोणत्या फोनची अंदाजे किंमत किती आणि त्यात कोणती वैशिष्ट्ये देण्यात येत आहे आणि मुख्य म्हणजे कोणत्या फोनची किंमत तुमच्या बजेटमध्ये आहे. पाहा डिटेल्स.
सध्या स्मार्टफोन्समध्ये रोजच नव- नवीन मॉडेल्सची एन्ट्री होत आहे. भारतीय बाजारपेठेत, देश आणि जगातील सुप्रसिद्ध स्मार्टफोन निर्माते एकापेक्षा जास्त स्मार्टफोन ऑफर करत राहतात. जर तुम्ही तुमच्यासाठी नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आम्ही तुम्हाला काही उत्तम स्मार्टफोनची माहिती देत आहोत. आज आम्ही तुम्हाला सप्टेंबरमध्ये बाजारात येणाऱ्या काही जबरदस्त स्मार्टफोनची माहिती देत आहोत. जे JioPhone Next, Asus Z8, MicroMax In Note 1 Pro, Redmi 10 Prime, iPhone 13 Series, iQOO 8 Series, Samsung Galaxy S21 FE आहेत. Samsung Galaxy A52, Vivo 70 Series आणि itel Vision Series. पाहा कोणत्या फोनची अंदाजे किंमत किती आणि त्यात कोणती वैशिष्ट्ये देण्यात येत आहे आणि मुख्य म्हणजे कोणत्या फोनची किंमत तुमच्या बजेटमध्ये आहे. पाहा डिटेल्स.
Vivo 70 Series
यात ४२०० mAh ची बॅटरी आहे. तसेच, या स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. फोनमध्ये ३२ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा दिला जाऊ शकतो. हा फोन सप्टेंबरच्या शेवटी लाँच केला जाऊ शकतो. Vivo 70 Series ची अंदाजे किंमत ५०,००० रुपये असू शकते.
itel Vision Series :
Itel Vision मध्ये उत्तम डिस्प्ले दिला जाऊ शकतो. यात २GB रॅम आणि ३२ GB स्टोरेज दिले जाऊ शकते. त्यात मोठी बॅटरी देण्यात आली आहे. या स्मार्टफोनमध्ये ८ मेगापिक्सलचा ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप दिला जाईल. सेल्फीसाठी या फोनमध्ये ५ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला जाईल. फोन १० सप्टेंबरला लाँच होऊ शकतो. itel Vision ची अंदाजे किंमत ५,००० रुपये असू शकते.
Samsung Galaxy A52
स्मार्टफोनमध्ये ऑक्टा-कोर स्नॅपड्रॅगन ७५० G प्रोसेसर असेल. या स्मार्टफोनची बॅटरी ४५०० mAh आहे. कॅमेरा सेटअपबद्दल बोलायचे झाले तर या स्मार्टफोनमध्ये क्वाड रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला असेल. यामध्ये ६४ मेगापिक्सलचा प्राथमिक कॅमेरा दिला जाऊ शकतो. हे २८ सप्टेंबर रोजी लाँच केले जाऊ शकते. Samsung Galaxy A52 ची अंदाजे किंमत २६,४९९ रुपये असू शकते.
Samsung Galaxy 21 FE :
यात ऑक्टा-कोर स्नॅपड्रॅगन 888 प्रोसेसर असेल. या स्मार्टफोनमध्ये ८ GB रॅम देण्यात येणार आहे. यात ४३७० mAh ची बॅटरी असेल, जी ४५ W फास्ट चार्जरद्वारे चार्ज केली जाऊ शकते. याशिवाय फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये ३२ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा दिला जाऊ शकतो. हा फोन सप्टेंबरच्या मध्यावर लाँच केला जाऊ शकतो. फोनची अंदाजे किंमत ४०,००० ते ५०,००० रुपये असू शकते.
iQOO 8
यात ऑक्टा-कोर स्नॅपड्रॅगन ८८८ प्रोसेसर असेल. याव्यतिरिक्त, यात १२ जीबी रॅम आणि ५१२ जीबी इंटर्नल स्टोरेज आहे. या स्मार्टफोनमध्ये ४३५० mAh ची बॅटरी आहे जी १२० W फास्ट चार्जरद्वारे चार्ज केली जाऊ शकते. फोनमध्ये क्वाड रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या मालिकेअंतर्गत, iQOO 8 आणि iQOO 8 प्रो दिले जाऊ शकतात. हा फोन सप्टेंबरच्या शेवटी लाँच केला जाऊ शकतो. iQOO 8 ची अंदाजे किंमत ४०,००० रुपये आहे.
iPhone 13 Series
iPhone 13 सीरीजमध्ये ४ आयफोन असतील. पहिला iPhone 13, iPhone 13 Pro , iPhone 13 pro max आणि iPhone 13 मिनी असू शकतो. या iPhone 13 सीरीजची प्री-बुकिंग १७ सप्टेंबरपासून करता येईल. त्याचबरोबर २४ सप्टेंबरला विक्रीची शक्यता वर्तवली जात आहे. अपडेटेड चिपसेट iPhone 13 मध्ये दिला जाईल. याशिवाय विस्तारित रॅम सपोर्ट मिळू शकतो. हा फोन १४ सप्टेंबरला लाँच केला जाऊ शकतो. iPhone 13 ची अंदाजित किंमत १,००,००० रुपये आहे.
Redmi 10 Prime
यात ६.५ इंच FHD+ LCD डिस्प्ले आहे. त्याचा रिफ्रेश रेट ९० Hz आहे. यात ऑक्टा-कोर मीडियाटेक हेलियो जी ८८ प्रोसेसर असेल. तसेच ४ GB रॅम आणि १२८ GB इंटरनल स्टोरेज दिले जाईल. या स्मार्टफोनमध्ये ५०००० mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. याशिवाय क्वाड रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात अँड्रॉइड १० ऑपरेटिंग सिस्टम देण्यात आली आहे. हा फोन ३ सप्टेंबर ला लाँच केला जाऊ शकतो. Redmi 10 Prime ची अंदाजे किंमत १२,००० रुपये आहे.
MicroMax In Note 1 Pro
MicroMax In Note 1 Pro मध्ये ऑक्टा-कोर मीडियाटेक हेलियो जी ९० प्रोसेसर असेल. या स्मार्टफोनमध्ये ४ GB रॅम देण्यात आली आहे. तसेच अँड्रॉईड १० ऑपरेटिंग सिस्टम देण्यात आली आहे. हा फोन सप्टेंबरच्या मध्यावर लाँच केला जाऊ शकतो. मायक्रोमॅक्स इन नोट 1 प्रोची अंदाजे किंमत १०,००० रुपये आहे.
Asus Z8:
ASUS Zenfone ८ मध्ये ५.९ इंच सुपर AMOLED डिस्प्ले असेल जो १२० Hz रिफ्रेश रेट असेल. या स्मार्टफोनमध्ये स्नॅपड्रॅगन ८८८ प्रोसेसर देण्यात आला आहे. यात १२ GB ची रॅम आहे. तसेच ४००० mAh ची बॅटरी दिली जाईल. लाँच डेट बद्दल बोलायचे झाले तर हा फोन १५ सप्टेंबर ला लाँच केला जाऊ शकतो. Asus Z8 ची अंदाजे किंमत २०,००० रुपये आहे.
JioPhone Next
या फोनमध्ये मागील पॅनलमध्ये स्पीकर ग्रिल दिले जाईल. या फोनच्या फ्रंट पॅनलमध्ये सेल्फी कॅमेऱ्यासह जाड टॉप आणि बॉटम बेझल असेल. कंपनीने सांगितले आहे की हा फोन अँड्रॉइडच्या विशेष आवृत्तीवर काम करेल. गुगल असिस्टंट, टेक्स्ट-टू-स्पीच क्षमता, भाषा अनुवाद, एआर फिल्टरसह स्मार्ट कॅमेरा आणि बरेच काही या स्मार्टफोनमध्ये दिले जाऊ शकते. जिओफोन नेक्स्ट १० सप्टेंबर रोजी लाँच केला जाऊ शकतो. JioPhone Next ची अंदाजित किंमत ३,४९९ रुपये आहे.
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3zLFcBS