नवी दिल्ली : तुम्ही युजर असल्यास, मित्र- मैत्रिणींना Friend Requests पाठवत आणि Accept करत असालच. पण, फेसबुकच्या फ्रेंड रिक्वेस्ट सिस्टीममध्ये एक मोठे सिक्रेट लपलेले असून फार कमी युजर्सना याबद्दल माहिती आहे. हे रहस्य तुम्ही पाठवलेल्या फ्रेंड रिक्वेस्ट न स्वीकारण्याशी संबंधित आहे. जाणून घ्या सविस्तर. वाचा: गेल्या काही महिन्यांत किंवा गेल्या वर्षांमध्ये तुम्ही कुणाला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवल्या हे तुम्ही विसरला असाल आणि त्या रिक्वेस्ट्स स्वीकारल्या गेल्या आहेत की नाही हे तपासायचे असल्यास, त्यासाठी एक सोप्पी ट्रिक आहे. आज आम्ही तुम्हाला याच ट्रिकबद्दल सांगणार आहोत. याच्या मदतीने तुम्ही आधी पाठवलेल्या फ्रेंड रिक्वेस्टचे स्टेटस तपासू शकता आणि हवे असल्यास रिक्वेस्ट कॅन्सल देखील करू शकता. अशा प्रकारे फेसबुकवर सेंट फ्रेंड रिक्वेस्ट शोधा :
- सर्वप्रथम तुमच्या स्मार्टफोनवर फेसबुक अॅप उघडा. यानंतर अॅपच्या वरच्या उजव्या बाजूला दिलेल्या तीन आडव्या लाईन्सवर टॅप करा.
- येथे तुम्हाला अनेक पर्याय दिसतील. यामधून फ्रेंड्स निवडा. तुम्ही पाहू शकता की तुमच्या किती फ्रेंड रिक्वेस्ट पेंडिंग आहेत, ज्या तुम्ही स्वीकारल्या नाहीत.
- येथे तुम्हाला Suggested Friends देखील दिसतील. यानंतर, तुम्ही See All वर टॅप करून सर्व पेंडिंग फ्रेंड रिक्वेस्ट्स पाहू शकता.
- गेल्या काही वर्षांत किंवा महिन्यांत तुम्ही स्वीकारल्या नाहीत अशा फ्रेंड रिक्वेस्ट्स कुणी पाठवल्या हे जर तुम्हाला पाहायचे असेल तर यासाठी वरच्या उजवीकडील तीन डॉट्स वर टॅप करा.
- टॅप केल्यानंतर, तुम्हाला स्क्रीनच्या तळाशी View Sent Requests चा पर्याय दिसेल.
- येथे तुम्ही अशा लोकांची लिस्ट पाहू शकता ज्यांनी तुमची फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारली नाही.
- ही लिस्ट पाहिल्यानंतर, इच्छित असल्यास सेंट फ्रेंड रिक्वेस्ट देखील रद्द करू शकता.
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/39JokR8