Full Width(True/False)

Vivo ने लाँच केला सर्वात 'स्वस्त' आणि स्टायलिश स्मार्टफोन, फीचर्स पाहताच म्हणाल मस्तच आहे फोन

नवी दिल्लीः ने काही महिन्याआधी भारातात स्मार्टफोनला आणले होते. परंतु, आता कंपनीने या फोनला अधिकृतपणे केनियात लाँच केले आहे. स्मार्टफोनचे खास वैशिष्ट्ये म्हणजे यात ड्युअल रियर कॅमेरा, Helio P35 SoC आणि 5,000mAh ची बॅटरी दिली आहे. Vivo Y21 ची किंमत १५४ डॉलर म्हणजेच ११ हजार ४२९ रुपये आहे. या फोनला दोन कलर ऑप्शन मध्ये डायमंड ग्लो आणि मिडनाइट ब्लू मध्ये आणले आहे. स्मार्टफोन केनियामधील अधिकृत चॅनेलवरून खरेदीसाठी उपलब्ध करण्यात आला आहे. विवो Y21 मध्ये ६.५१ इंचाचा वॉटर ड्रॉप नॉच डिस्प्ले दिला आहे. हा 1600 x 720-पिक्सेल रिज़ॉल्यूशनचा एलसीडी पॅनेल आहे. या डिव्हाइस मध्ये सेल्फीसाठी 8MP चा फ्रंट कॅमेरा आणि रियरमध्ये ड्युअल कॅमेरा सिस्टम आहे. यात 13MP चा मुख्य सेन्सर आणि 2MP चा मायक्रो लेन्स दिला आहे. रियर कॅमेरा आयलँड मध्ये एलईडी फ्लॅश दिला आहे. फोनची बॅटरी फोनमध्ये MediaTek Helio P35 SoC कडून ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी इंटरनल स्टोरेज दिले आहे. याचे खास वैशिष्ट्ये म्हणजे यात अतिरिक्त १ जीबी वाढवण्याचा ऑप्शन आहे. स्टोरेजला मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने वाढवता येवू शकते. स्मार्टफोनमध्ये 5,000mAh ची बॅटरी दिली आहे. 18W फास्ट चार्जिंग सपोर्ट करते. विवोच्या माहितीनुसार, फक्त ३० मिनिट चार्ज केल्यानंतर हे शून्य ते ३४ टक्के होते. Vivo Y21 चे अन्य फीचर्स विवोच्या या स्मार्टफोनमध्ये आउट ऑफ द बॉक्स अँड्रॉयड ११ वर बूस्ट करतो. हा फोन फनटच ओएस ११.१ आहे. यात चार्जिंगसाठी खालच्या बाजुस यूएसबी टाइप सी पोर्ट दिले आहे. यात ३.५ एमएम हेडफोन जॅक दिले आहे. वाचा: हाच वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3m7en5B