Full Width(True/False)

दमदार स्पीकर्स ते जबरदस्त डिस्प्लेचे 'टॉप ५' लॅपटॉप्स, किंमत ३० हजारांपेक्षा कमी, जाणून घ्या डिटेल्स

नवी दिल्लीः सध्या अनेक ऑनलाइन कामांसाठी स्मार्टफोन्सचा वापर केला जातो. परंतु, असे काही कामे असतात ते लॅपटॉपवर जास्त चांगल्या प्रकारे करता येवू शकतात. ऑफिसच्या कामासाठी, मूव्ही पाहण्यासाठी, हे काम आपण आपल्या फोनवर करू शकतो. परंतु, लॅपटॉवर केल्यास मोठा फायदा होतो. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला या ठिकाणी अशाच टॉप ६ लॅपटॉप संबंधी खास माहिती देत आहोत, जाणून घ्या डिटेल्स. आसुस क्रोमबुक C223 फ्लिपकार्टवर १८ हजार ९९९ रुपयात मिळणारा हा लॅपटॉप या लिस्टमध्ये सर्वात स्वस्त लॅपटॉप आहे. इंटेलच्या सेलेरॉन ड्युअल कोर प्रोसेसर आणि क्रोम ऑपरेटिंग सिस्टमच्या या लॅपटॉप मध्ये तुम्हाला ११.६ इंचाचा एचडी डिस्प्ले, ७२० पिक्सेलचा वेब कॅमेरा आणि ४ जीबी रॅम आणि ३२ जीबीचे स्टोरेजची सुविधा मिळेल. यात तुम्हाला ऑप्टिकल डिस्क ड्राइव्ह सुद्धा मिळेल. फ्लिपकार्टवरून खरेदी केल्यास एक वर्षाची ऑनसाइट वॉरंटी सुद्धा मिळेल. आसुस क्रोमबुक सेलेरॉन डुअल कोर आसुसचा हा लॅपटॉप सेलेरॉन ड्युअल कोर प्रोसेसर द्वारा संचालित आहे. ४ जीबी रॅम प्लस ६४ जीबी स्टोरेजच्या सुविधेसोबत मिळेल. यात ७२० पिक्सेलचा एचडी वेब कॅमेरा आणि बॅक लिट कीबोर्ड असेल. याची किंमत २२ हजार ४९९ रुपये आहे. एसर क्रोमबुक 311 एसरचा हा लॅपटॉप ११.६ इंच आमि 1366 x 768 पिक्सेलचा डिस्प्ले, ४ जीबी रॅम प्लस ३२ जीबीचे स्टोरेज आणि इंटेल यूएचडी ग्राफिक्स ६०० सोबत मिळत आहे. या लॅपटॉपचे खास वैशिष्ट्ये म्हणजे यात एकदा फुल चार्ज नंतर हा लॅपटॉप १० तासांपर्यंत चालतो. याची किंमत २२ हजार ८९० रुपये आहे. एचपी क्रोमबुक 11A या लॅपटॉपची किंमत २२ हजार ९९० रुपये आहे. या लॅपटॉपमध्ये मीडियाटेक MT8183 प्रोसेसर दिले आहे. ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेज सोबत येणाऱ्या या लॅपटॉप मध्ये ११.६ इंचाचा एचडी डिस्प्ले, एक यूएसबी टाइप सी आणि एक यूएसबी टाइप सी पोर्ट, बिल्ट इन ड्युअल स्पीकर्स, ड्युअल मायक्रोफोन्स आणि गुगल असिस्टेंट सपोर्ट मिळेल. आसुस वीवोबुक 15 (2020) २०२० मध्ये लाँच झालेल्या या लॅपटॉपचे बेस मॉडल यूएचडी ग्राफिक्स ६००, ४ जीबी रॅम आणि २५६ जीबीचे एसएसडी स्टोरेज आणि विंडो हेलोचा सपोर्ट मिळेल. सोबत हा इंटेल सेलेरॉन N4020 प्रोसेसर द्वारा संचालित आहे. १५.६ इंचाचा एचडी डिस्प्ले आहे. तसेच फिंगरप्रिंट स्कॅनर सुद्धा दिले आहे. याची किंमत २८ हजार ६९८ रुपये आहे. वाचा: वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3gURXTh