मुंबई- महाराष्ट्रात करोनाची तिसरी लाट येण्याची चिन्ह दिसत असल्याने राज्य सरकारकडून काळजी घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अशात बॉलिवूडची लोकप्रिय दिग्दर्शिका आणि कोरिओग्राफर हिला करोनाची लागण झाली आहे. काही दिवसांपूर्वी लोकप्रिय दिग्दर्शक रूमी जाफरी यांनाही करोनाची लागण झाली होती. आता फराहला करोनाची लागण झाल्याने बॉलिवूडमध्ये चिंतेचं वातावरण आहे. तर लसीचे दोन्ही डोस घेतले असताना देखील आपल्याला करोनाची लागण झाल्याने फराहने आपण काळा टीका लावला नसल्याने आपल्याला करोनाची लागण झाली असल्याचं म्हटलं आहे. फराहने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर याबद्दल माहिती देत लिहिलं, 'मला खूप आश्चर्य वाटतंय की हे झालंय, कारण लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतरही फक्त काळा टीका न लावल्याने मला करोनाची लागण झाली आहे. दोन्ही डोस घेऊन मी दोन डोस घेतलेल्या व्यक्तींसोबत चित्रीकरणदेखील करत होते. मी त्या सगळ्यांना माहिती दिली आहे जे माझ्या संपर्कात आले होते. माझ्या वाढत्या वयामुळे जर कोणाला सांगायचं राहिलं असेल तर त्यांनी कृपया तपासणी करून घ्या. मी लवकर बरी होईन अशी आशा व्यक्त करते.' फराहने काही दिवसांपूर्वी शिल्पा शेट्टीसोबत 'सुपर डान्सर ४' चं चित्रीकरण केलं होतं. याशिवाय फराहने अमिताभ बच्चन यांच्या 'कौन बनेगा करोडपती १३' मध्ये एका खास भागाचं चित्रीकरण देखील केलं आहे. अशात फराह करोना पॉसिटीव्ह आल्याने अनेक कलाकारांसाठी चिंता वाढली आहे. तर फराह खान परीक्षकाची भूमिका साकारत असलेल्या कॉमेडी शो मध्ये मिका सिंह हजेरी लावणार असल्याचं वृत्त आहे.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2WIMMyT