Full Width(True/False)

Redmi 10 Prime उद्या भारतात लाँच होणार, फोनमध्ये मिळेल 6000mAh ची बॅटरी

नवी दिल्लीः स्मार्टफोनची गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू आहे. कंपनीकडून कन्फर्म करण्यात आले आहे की, या फोनला ३ सप्टेंबर रोजी भारतात लाँच करण्यात येणार आहे. लाँचिंग डेट आधी कंपनीने या अपकमिंग स्मार्टफोनला अनेक वेळा टीज केले आहे. गेल्यावेळी कंपनीचे ग्लोबल VP मनु कुमार जैन यांनी याच्या प्रोसेसरला टीज केले होते. आता या फोनचा आणखी एक टीझर आले आहे. मनु कुमार जैन यांनी एक ट्विटर पोस्ट द्वारे कन्फर्म केले आहे की, रेडमीच्या या फोनमध्ये 6000mAh ची बॅटरी देण्यात येईल. 6000mAh बॅटरीचा सर्वात हलका फोन दावा केला जात आहे की, हा फोन 6000mAh च्या बॅटरी सोबत येणारा सर्वात हलका स्मार्टफोन असणार आहे. ट्विट मध्ये जैन यांनी हेही सांगितले आहे की, फोन स्टँडर्ड फास्ट चार्जिं सोबत रिव्हर्स फास्ट चार्जिंगला सपोर्ट करणार आहे. शेयर करण्यात आलेल्या टीझर मध्ये फोनचे फ्रंट पॅनेल पाहिले जावू शकते. टीझर पाहून फोनमध्ये स्लीम बेजल्स पंच होल डिस्प्ले ऑफर केले जावू शकते. रेडमीच्या फोनचे फीचर कंपनी या फोनला रेडमी ९ प्राइमचा सक्सेसर म्हणून लाँच करणार आहे. असा दावा केला जात आहे की, या फोनमध्ये आधीच्या व्हेरियंटच्या तुलनेत खूप सुधारणा पाहायला मिळू शकते. त्यामुळे कंपनी या फोनला नवीन डिझाइन सोबत लाँच करण्याची शक्यता आहे. या फोनमध्ये फुल एचडी प्लस रिझॉल्यूशनचा ६.५ इंचाचा डिस्प्ले दिला जाईल. डिस्प्ले प्रोटेक्शनसाठी कंपनी या फोनमध्ये कॉर्निंग गोरिला ग्लास ऑफर करू शकते. या फोनला ६ जीबी रॅम आणि ६४ जीबीचे इंटरनल स्टोरेज स्टोरेज दिले जाणार आहे. प्रोसेसर म्हणून या फोनमध्ये मीडियाटेक हीलियो जी८८ चिपसेट दिला आहे. फोटोग्राफीसाठी फोनमध्ये रियर मध्ये एलईडी फ्लॅश सोबत ट्रिपल रियर कॅमेरा सेन्सर मिळू शकते. वाचा: वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2YkqwvX