Full Width(True/False)

ठरलं ! भारतात लवकरच येतोय Samsung Galaxy F42 5G, फोन Google प्ले कन्सोलवर लिस्ट,पाहा डिटेल्स

नवी दिल्ली : भारतात लाँच करण्यात येणार आहे . हा फोन 5G ची नवीन आवृत्ती असेल. यापूर्वी कंपनीने Galaxy M32 5G भारतात लाँच केले असून आता कंपनी Samsung Galaxy F42 5G लाँचवर काम करत आहे. हा फोन सप्टेंबर महिन्यात लाँच केला जाऊ शकतो. मात्र, कंपनीकडून याबाबत कोणतेही निवेदन आलेले नाही. कंपनीने Google Play कन्सोलवर Samsung Galaxy F42 5G लिस्ट केला असून त्यात फोनची काही मुख्य वैशिष्ट्ये उघड झाली आहेत. वाचा: Samsung Galaxy F42 5G: वैशिष्ट्ये Google प्ले कन्सोलच्या लिस्टनुसार, Samsung Galaxy F42 5G F 42 5G Galaxy Wide 5 मॉडेल क्रमांकासह लिस्ट आहे. हा फोन Dimensity 700 प्रोसेसरने सुसज्ज असू शकतो. तसेच, माली G57 GPU देखील यात दिले जाऊ शकते. या प्रोसेसरसह, Poco M3 Pro, Realme Narzo 30 5G, Oppo A93s 5G आणि Redmi Note 10 5G सारखी डिव्हाइसेस यापूर्वीही भारतात लाँच करण्यात आली आहेत. Samsung Galaxy F 42 5G फोन ६ जीबी रॅमने सुसज्ज असेल. तसेच, यात १२८ जीबी स्टोरेज दिले जाऊ शकते. लिस्टवरून देखील कन्फर्म झाले आहे की, फोनमध्ये Android ११ दिले जाऊ शकते, जे OneUI ३.१ इंटरफेसवर आधारित असू शकते. फोनचे बेझल जाड असतील. तसेच, याला १०८० x २००९ पिक्सेल FHD + रिझोल्यूशन दिले जाऊ शकते. फोनच्या डिस्प्ले आकाराचा मात्र यात उल्लेख नाही. Samsung Galaxy F42 5G भारताचा पुढील बजेट 5G फोन ? Samsung Galaxy F42 5G भारतात फोन एन्ट्री करणार ही माहिती गुगल प्ले कन्सोलवरील लिस्टिंगमुळे निश्चित झाली आहे. परंतु, लाँचची तारीख अद्याप नक्की नाही. फोन Dimensity ७०० प्रोसेसरसह गीकबेंच वर देखील लिस्ट होता. अहवालांनुसार, Samsung Galaxy F 42 5 जी स्मार्टफोन Galaxy A 22 5 जी ची रीब्रांडेड आवृत्ती असू शकते. तसेच, हा फोन भारतातील पुढील बजेट 5G फोन असू शकतो असेही म्हटले जात आहे. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3BFaBa1