Full Width(True/False)

तुम्हालाही मिळेल ट्विटर अकाउंटवर ब्लू टिक, कंपनीने पुन्हा सुरू केली प्रोसेसर; पाहा डिटेल्स

नवी दिल्ली : ने आपल्या व्हेरिफिकेशन प्रोग्रामला जगभरातील यूजर्ससाठी सुरू केले आहे. याबाबतची माहिती कंपनीने ट्विटरवर दिली. अ‍ॅप्लिकेशन प्रोसेसला ऑगस्टमध्ये काही बदलांसाठी तात्पुरती स्थगिती दिली होती. वाचा: एका ट्विटमध्ये कंपनीने माहिती दिली की, अ‍ॅप्लिकेशनला पुन्हा अकाउंट सेटिंग टॅबद्वारे अ‍ॅक्सेस करता येईल. यासाठी अँड्राइड फोनमध्ये अ‍ॅपवर मेन्यूमध्ये जावे लागेल. येथे सेटिंग्स आणि प्रायव्हसी सिलेकट करावे लागेल. येथे तुम्हाला अकाउंट सेक्शनमध्ये व्हेरिफिकेशन रिक्वेस्टचा पर्याय दिसेल. ट्विटर ब्लू टिक कोणत्याही यूजरला देत नाही. यासाठी योग्य कॅटेगरीमध्ये पात्र असणे गरजेचे आहे. कंपनीने ६ कॅटेगरींची माहिती दिली आहे, ज्यात यूजर्स ब्लू बॅजसाठी अर्ज करू शकतात. ट्विटर अकाउंटवर ब्लू टिकसाठी सरकारी अधिकारी, पत्रकार, ब्रँड अथवा व्यवसाय व अन्य उल्लेखनीय कामगिरी असलेली लोकं अर्ज करू शकतात. यासाठी यूजर्सला अधिकृत वेबसाइटची लिंक, अथवा पासपोर्ट असे सरकारी कागदपत्रं आणि अधिकृत ईमेल द्यावा लागतो. व्हेरिफिकेशनसाठी केलेली विनंती रद्द झाल्यास, ३० दिवसांनी पुन्हा अर्ज करू रिक्वेस्ट सबमिट करू शकता. यानंतर तुमच्या प्रोफाइलवर व्हेरिफिकेशन बॅज दिसेल. दरम्यान, ट्विटर वेरिफिकेशन प्रोग्रामला २०१७ मध्ये स्थगित करण्यात आले होते. त्यावेळी लोकांमध्ये संभ्रम असल्याने प्रक्रिया थांबवत असल्याचे कंपनीने म्हटले होते. यूजर्स ब्लू टिकला एंडोर्समेंट अथवा इंपोर्टेंसचे इंडिकेटर समजत होते. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3meTCVZ