Full Width(True/False)

सिद्धार्थप्रमाणे 'या' कलाकारांच्या मृत्यूने बसला होता धक्का

मुंबई- 'बिग बॉस १३' चा विजेता अभिनेता याच्या निधनाने संपूर्ण बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. सिद्धार्थचं काल२ सप्टेंबर रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. परंतु, सिद्धार्थ एकटाच असा अभिनेता नाही ज्याने अचानक या जगाचा निरोप घेतला. जाणून घेऊया अशाच काही कलाकारांबद्दल. १. बॉलिवूडचा लोकप्रिय अभिनेता सुशांतसिंह राजपूत याने १४ जून २०२० रोजी राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. सुशांतच्या मृत्यूने चाहत्यांना प्रचंड धक्का बसला होता. सुशांतने वयाच्या ३४ व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. २. आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारे अभिनेते इरफान खान यांचं २९ एप्रिल २०२० रोजी निधन झालं. इरफान ५४ वर्षाचे होते. इरफान यांची कर्करोगासोबतची झुंज अपयशी ठरली आणि त्यांनी चाहत्यांचा निरोप घेतला. ३. ऋषी कपूर बॉलिवूडचे लाडके अभिनेते ऋषी कपूर यांनी वयाच्या ६७ व्या वर्षी चाहत्यांचा निरोप घेतला. ऋषी कपूर अनेक वर्ष कर्करोगासोबत लढत होते. अमेरिकेतून उपचार घेऊन परतलेल्या ऋषीजींना पुन्हा त्रास होऊ लाल्याने त्यांना इस्पितळात भरती करण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांचं निधन झालं. ४. दिलीप कुमार ७ जुलै २०२१ रोजी चाहत्यांचा निरोप घेणारे जेष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांनी कित्येक वर्ष प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. श्वास घेण्यास अडचण येत असल्याने दिलीप कुमार यांना इस्पितळात भरती करण्यात आलं होतं. वयाच्या ९८ व्या वर्षी दिलीप कुमार यांनी अखेरचा श्वास घेतला. ५. बिक्रमजीत कंवरपाल अनेक चित्रपटातून आपल्या अभिनयाची जादू दाखवणारे अभिनेते बिक्रमजीत कंवरपाल यांनी १ जुलै २०२१ रोजी चाहत्यांचा निरोप घेतला. बिक्रमजीत यांचं करोनामुळे निधन झालं. ६. सुरेखा सीकरी राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या जेष्ठ अभिनेत्री सुरेख सीकरी यांचं १६ जुलै २०२१ रोजी निधन झालं. वयाच्या ७५ व्या वर्षी सुरेखा यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. ७. अनुपम श्याम 'प्रतिज्ञा' या मालिकेतून लोकप्रियता मिळवणारे अनुपम श्याम यांचं ८ आगस्ट रोजी निधन झालं. ते ६३ वर्षांचे होते.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2WQvfVd