Full Width(True/False)

गुगलने साकारले रुडोल्फ वेगल यांचे डुडल, महामारीपासून वाचवले होते हजारोंचे प्राण; पाहा डिटेल्स

नवी दिल्ली : डुडलच्या माध्यमातून खास दिवसाची, व्यक्तींची माहिती देत असते. याच क्रमात आज गुगलने पोलंडचे संशोधक, डॉक्टर आणि इम्यूनोलॉजिस्ट यांच्या १३८व्या जन्मदिनानिमित्त डुडल साकारात मानवंदना दिली आहे. वेगल यांनी सर्वात जुना संसर्गजन्य आजार टायफसवरील लस शोधण्याची कामगिरी केली होती. या कामगिरासाठी त्यांना एकदा नव्हे तर दोनदा देऊन सन्मानित करण्यात आले होते. वाचा: रुडोल्फ वेगल यांनी या आजारावरील लस निर्मितीसाठी अनेकवर्ष अभ्यास आणि संशोधन केले. वर्ष १९३६ मध्ये वेगल यांनी तयार केलेली लस यशस्वी ठरली होती. मध्ये काय आहे? डुडलमध्ये वेगल आपल्या हातात टेस्ट ट्यूब पकडून उभे आहेत. भिंतीवर उवां आणि मानवी शरीराचे चित्र दिसत आहे. इलस्ट्रेटरने गुगलला मायक्रोस्कोप, बर्नवर बीकर आणि होल्डरमध्ये टेस्ट ट्यूबला एका लॅब टेबलवर ठेवले आहे. रुडोल्फ वेगल यांचा वर्ष १८८३ मध्ये ऑस्ट्रो-हंगेरियन शहर प्रेजेरो येथे जन्म झाला होता. त्यांनी पोलंडच्या ल्वो विद्यापीठातून जैविक विज्ञानाचे शिक्षण घेतले होते. १९१४ मध्ये त्यांची पोलंडच्या सैन्यात पॅरासिटोलॉजिस्ट म्हणून नियुक्ती झाली. त्यावेळी पूर्व यूरोपमध्ये लाखो लोकांना टायफस या आजाराने ग्रासले होते. अशा स्थितीत त्यांनी यावर लस शोधण्याचा प्रयत्न केला. दुसऱ्या विश्वयुद्धात जर्मनीने पोलंडवर कब्जा केल्यानंतर वेगल यांना वॅक्सिन प्रोडक्शन प्लांट उघडावा लागला होता. या काळात वेगल यांच्या कामामुळे ५ हजाल लोकांना वाचवण्यात आले होते. देशभरात यावेळी लस पुरवठा करण्यात आला होता. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3DPUOae