Full Width(True/False)

डेटा संपण्याचे टेन्शनच नाही ! Jio-Airtel-Vi मध्ये मिळताहेत डेली डेटा लिमिट नसलेले प्लान्स, पाहा डिटेल्स

नवी दिल्ली: देशातील आघाडीच्या नेटवर्क प्रदाता कंपन्या Reliance , आणि Idea ने अलीकडे ३० दिवसांच्या वैधतेसह काही प्लान्स सादर केले आहेत. ज्यात, डेली डेटा लिमिट नाही. जर तुम्हाला डेली डेटा लिमिट शिवाय एखादा प्लान हवा असेल तर तुम्ही या प्लान्सचा नक्की विचार करू शकता . वाचा: Reliance Jio चा २४७ रुपयांचा प्लान: Reliance Jio च्या २४७ रुपयांच्या प्लानमध्ये ३० दिवसांची वैधता उपलब्ध आहे. डेटा बद्दल बोलायचे तर, या प्लान मध्ये एकूण २५ जीबी डेटा उपलब्ध आहे. तसेच, अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग देखील उपलब्ध आहे. युजर्स कोणत्याही नेटवर्कवर कोणत्याही मर्यादेशिवाय कॉल करू शकतात. याशिवाय या प्लॅनमध्ये दररोज १०० SMS देखील देण्यात येत आहे. इतर फायद्यांविषयी सांगायचे तर, या प्लानमध्ये जिओ अॅप्सचे मोफत सबस्क्रिप्शन दिले जाईल. Vodafone Idea चा २६७ रुपयांचा प्लान: Vodafone Idea च्या २६७ रुपयांच्या प्लानमध्ये ३० दिवसांच्या वैधतेसह २५ जीबी डेटा उपलब्ध आहे. या प्लानमध्ये अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग उपलब्ध आहे. युजर्स कोणत्याही नेटवर्कवर कोणत्याही मर्यादेशिवाय कॉल करू शकतात. तसेच, प्लानमध्ये दररोज १०० SMS ग्राहकांना मिळतील. इतर फायद्यांविषयी सांगायचे तर, या चित्रपटात Vi Movies & TV चा मोफत ऍक्सेस आहे. Airtel चा २९९ रुपयांचा प्लान: Airtel च्या २९९ रुपयांच्या प्लानमध्ये ३० दिवसांची वैधता आणि ३० जीबी डेटा आणि अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग उपलब्ध आहे. युजर्स कोणत्याही नेटवर्कवर कोणत्याही मर्यादेशिवाय कॉल करू शकतात. तसेच ग्राहकांना दररोज १०० मेसेज देखील उपलब्ध आहेत. इतर फायद्यांविषयी सांगायचे तर, एअरटेल थँक्स, Amazon प्राइम व्हिडिओ मोबाईल एडिशन मोफत चाचणी आणि एअरटेल एक्सस्ट्रीम प्रीमियमचे मोफत सबस्क्रिप्शन देखील या प्लानमध्ये उपलब्ध आहेत. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/38wgsBO