मुंबई- छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम '' सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. अभिनेता याने नुकतंच 'खतरों के खिलाडी ११' च्या ट्रॉफीवर त्याचं नाव कोरलं आहे. विजेता ठरल्याने अर्जुनाचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. अर्जुनसोबत त्याचे चाहते देखील आनंद साजरा करत आहेत. परंतु, सोशल मीडियावर 'खतरों के खिलाडी ११' च्या निर्णयाचा विरोध होताना दिसत आहे. अर्जुन विजयी झाल्याने उपविजेता ठरलेल्या हिचे चाहते प्रचंड नाराज झाले आहेत. सोशल मीडियावर 'Real Winner Divyanka' ट्रेण्ड करत आहे. नेटकऱ्यांच्या मते दिव्यांकाने कार्यक्रमाच्या सुरुवातीपासूनच प्रत्येक टास्क मन लावून केला. अगदी जीवावर खेळून दिव्यांकाने कठीणातील कठीण स्टंटदेखील पूर्ण करून दाखवला. दिव्यांकाच्या बिनधास्त स्टंट करण्याने चाहते देखील हैराण झाले होते. तिचा शूरपणा पाहून रोहित शेट्टीने दिव्यांकाला 'मगर राणी' चा किताब देखील दिला होता. दिव्यांकाने प्रत्येक स्टंटमध्ये इतर स्पर्धकांना तगडी टक्कर दिली आणि ती स्पर्धेत शेवटपर्यंत टिकून राहिली. तरीही फक्त २० सेकंदाच्या फरकाने अर्जुन विजेता झाल्याने दिव्यांकाचे चाहते नाराज झाले आहेत. ट्वीट करत चाहत्यांनी त्यांच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युझरने लिहिलं, 'खरी विजेता तर दिव्यांका आहे. तिने किती मेहनत आणि धडाडीने प्रत्येक स्टंट पूर्ण केला. हे पूर्णपणे चूक आहे.' दुसऱ्या युझरने लिहिलं, 'त्या ट्रॉफीची हकदार दिव्यांका आहे.' आणखी एका युझरने लिहिलं, 'जी या विजयासाठी खरी पात्र होती तिला विजयी नाही केलं. जो त्यांच्या वाहिनीचा चेहरा आहे त्याला ट्रॉफी दिली.' अशा अनेक प्रतिक्रिया देत चाहत्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3m1qVLW