Full Width(True/False)

४२५ दिवसांसाठी रोज ३ जीबी डेटा आणि कॉलिंग, BSNL प्लानपुढे जिओही फेल

नवी दिल्लीः सरकारी टेलिकॉम कंपनी वेळोवेळी नवीन नवीन प्लान घेऊन येत आहे. तसेच काही जुन्या प्लानमध्ये बदल करीत आहे. कंपनीने काही दिवसांपूर्वी एक प्लान बदलला होता. या प्लानमध्ये ग्राहकांना ४२५ दिवसाच्या वैधतेसोबत रोज ३ जीबी डेटा आणि कॉलिंग सारखे फायदे मिळतात. दुसऱ्या टेलिकॉम कंपन्यांचे प्लान या प्लानसमोर फेल आहेत. जाणून घ्या डिटेल्स. चा ४२५ दिवसाचा प्लान आम्ही बीएसएनएलच्या ज्या प्लान संबंधी बोलत आहोत. त्याची किंमत २३९९ रुपये आहे. कंपनी आधी ३६५ दिवसाची वैधता देत होती. परंतु, आता ४२५ दिवसाची वैधता मिळते. प्लानमध्ये सर्व नेटवर्कवर फ्री कॉलिंग आणि रोज १०० SMS पाठवण्याची सुविधा मिळते. याशिवाय, अनलिमिटेड साँग चेंज ऑप्शन सोबत Free BSNL ट्यून्स आणि EROS NOW चे कंटेट सुद्धा दिले जाते. या प्लानची तुलना जिओ आणि वोडाफोन आयडियाशी करून पाहा. Jio चा २३९९ रुपयाचा प्लान रिलायन्स जिओ २३९९ रुपयाचा प्लान ऑफर करते. जिओ प्लान कमी वैधता आणि कमी डेटा सोबत येतो. यात ग्राहकांना ३६५ दिवसाची वैधता आणि रोज फक्त २ जीबी डेटा मिळतो. प्लानमध्ये सर्व नेटवर्कवर फ्री कॉलिंग आणि रोज १०० SMS पाठवण्याची सुविधा मिळते. याशिवाय, JioTV, JioCinema, JioNews, JioSecurity, JioCloud सारख्या अॅप्सचे सब्सक्रिप्शन मिळते. Vi चा २३९९ रुपयाचा प्लान वोडाफोन आयडिया सुद्धा २३९९ रुपयाचा प्लान ऑफर करते. या प्लानमध्ये ग्राहकांना ३६५ दिवसाची वैधता सोबत रोज १.५ जीबी डेटा दिला जातो. या प्लानमध्ये अनलिमिटेड कॉलिंग आणि रोज १०० एसएमएस मिळते. तसेच ग्राहकांना १ वर्षासाठी ZEE5 5 चे प्रीमियम सब्सक्रिप्शन, विकेंड डेटा रोलओव्हर, फ्री नाइट डेटा आणि Vi Movies & TV Classic चे फ्री सब्सक्रिप्शन दिले जाते. वाचा: वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3hOd4XR