Full Width(True/False)

मनोरंजनाचा डबल धमाका! स्वस्तात मस्त बेस्ट स्मार्ट LED TV, किंमत १५ हजारांपेक्षा कमी, पाहा फीचर्स

आज प्रत्येक घरात स्मार्ट टीव्ही असतोच. अशात तुम्ही देखील जर तुमचा जुना टीव्ही अपग्रेड करण्याचा किंवा नवीन टीव्ही खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्या बजेटमध्ये आणि कमी किंमतीत येणारे अनेक चांगले स्मार्ट टीव्हीचे पर्याय सध्या मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. नवीन स्मार्ट टीव्ही खरेदीसाठी हा काळ बेस्ट ठरू शकतो. ग्राहकांना विविध पर्याय मिळावे याकरिता देश आणि जगातील सुप्रसिद्ध कंपन्या भारतीय बाजारात एकापेक्षा जास्त स्मार्ट टीव्ही लाँच करतच असतात. यात प्रामुख्याने मोटोरोला, Kodak 7XPRO, मायक्रोमॅक्स, iFFALCON आणि Thomson हे भारतीय बाजारपेठेतील सर्वोत्तम पर्याय आहेत.आज आम्ही तुम्हाला १५ हजार रुपयांच्या बजेटमध्ये येणाऱ्या सर्वोत्तम स्मार्ट टीव्हीबद्दल सविस्तर माहिती देत आहो. जाणून घ्या या स्मार्ट टीव्हीच्या फीचर्स- किंमत इत्यादींविषयी सर्व काही आणि ठरवा घरी कोणता स्मार्ट टीव्ही आणायचा ते.

आज प्रत्येक घरात स्मार्ट टीव्ही असतोच. अशात तुम्ही देखील जर तुमचा जुना टीव्ही अपग्रेड करण्याचा किंवा नवीन टीव्ही खरेदी करण्याचा विचार करत असाल तर, तुमच्या बजेटमध्ये आणि कमी किंमतीत येणारे अनेक चांगले स्मार्ट टीव्हीचे पर्याय सध्या मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. नवीन स्मार्ट टीव्ही खरेदीसाठी हा काळ बेस्ट ठरू शकतो. ग्राहकांना विविध पर्याय मिळावे याकरिता देश आणि जगातील सुप्रसिद्ध कंपन्या भारतीय बाजारात एकापेक्षा जास्त स्मार्ट टीव्ही लाँच करतच असतात. यात प्रामुख्याने मोटोरोला, Kodak 7XPRO, Micromax, iFFALCON आणि Thomson हे भारतीय बाजारपेठेतील सर्वोत्तम पर्याय आहेत.आज आम्ही तुम्हाला १५ हजार रुपयांच्या बजेटमध्ये येणाऱ्या सर्वोत्तम स्मार्ट टीव्हीबद्दल सविस्तर माहिती देत आहो. जाणून घ्या या स्मार्ट टीव्हीच्या फीचर्स- किंमत इत्यादींविषयी सर्व काही आणि ठरवा घरी कोणता स्मार्ट टीव्ही आणायचा ते.

मनोरंजनाचा डबल धमाका! स्वस्तात मस्त बेस्ट स्मार्ट LED TV, किंमत १५ हजारांपेक्षा कमी, पाहा फीचर्स

आज प्रत्येक घरात स्मार्ट टीव्ही असतोच. अशात तुम्ही देखील जर तुमचा जुना टीव्ही अपग्रेड करण्याचा किंवा नवीन टीव्ही खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्या बजेटमध्ये आणि कमी किंमतीत येणारे अनेक चांगले स्मार्ट टीव्हीचे पर्याय सध्या मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. नवीन स्मार्ट टीव्ही खरेदीसाठी हा काळ बेस्ट ठरू शकतो. ग्राहकांना विविध पर्याय मिळावे याकरिता देश आणि जगातील सुप्रसिद्ध कंपन्या भारतीय बाजारात एकापेक्षा जास्त स्मार्ट टीव्ही लाँच करतच असतात. यात प्रामुख्याने मोटोरोला, Kodak 7XPRO, मायक्रोमॅक्स, iFFALCON आणि Thomson हे भारतीय बाजारपेठेतील सर्वोत्तम पर्याय आहेत.आज आम्ही तुम्हाला १५ हजार रुपयांच्या बजेटमध्ये येणाऱ्या सर्वोत्तम स्मार्ट टीव्हीबद्दल सविस्तर माहिती देत आहो. जाणून घ्या या स्मार्ट टीव्हीच्या फीचर्स- किंमत इत्यादींविषयी सर्व काही आणि ठरवा घरी कोणता स्मार्ट टीव्ही आणायचा ते.

Kodak 7XPRO 32-inch HD ready Smart LED TV
Kodak 7XPRO 32-inch HD ready Smart LED TV

हा स्मार्ट टीव्ही ARM Cortex-A53 प्रोसेसर वर काम करतो. या स्मार्ट टीव्हीमध्ये १GB रॅम आणि ८GB इंटरनल स्टोरेज आहे. तसेच, हे Android ऑपरेटिंग सिस्टम ९.० वर काम करते. या स्मार्ट टीव्हीमध्ये अॅप्स डाउनलोड करण्यासाठी गुगल प्ले स्टोअर देण्यात आले असून क्रोमकास्ट आणि लाइव्ह टीव्हीमध्ये तयार केलेले ५ हजारांहून अधिक अॅप्स, गुगल असिस्टंट आहेत. या स्मार्ट टीव्हीची किंमत १३,९९० रुपये आहे.

Thomson 9A 32-inch HD Ready LED Smart Android TV
Thomson 9A 32-inch HD Ready LED Smart Android TV

थॉमसन 9 ए मध्ये ३२ इंचाचा HD रेडी एलईडी डिस्प्ले आहे. डिव्हाइस ARM Cortex A53 प्रोसेसर वर काम करते. या स्मार्ट टीव्हीमध्ये १GB रॅम आणि ८GB स्टोरेज असून स्मार्ट टीव्हीमध्ये अॅप्स डाउनलोड करण्यासाठी गुगल प्ले स्टोअर देण्यात आले आहे. टीव्हीमध्ये प्राइम व्हिडिओ, हॉटस्टार, ZEE5, सोनीलिव्ह, , क्रोमकास्ट आणि गूगल असिस्टंटसह 5 हजारांहून अधिक अॅप्स आणि गेम अॅप्स आहेत. स्मार्ट टीव्हीची किंमत १४,४९९ रुपये आहे.

iFFALCON 32-inch HD Ready LED Smart Android TV
iFFALCON 32-inch HD Ready LED Smart Android TV

iFFALCON मध्ये ३२ इंचाचा HD रेडी LED डिस्प्ले आहे. या स्मार्ट टीव्ही मध्ये ६४ बिट प्रोसेसर आहे. या स्मार्ट टीव्हीमध्ये १.५ जीबी रॅम आणि ८ जीबी स्टोरेज असून डिव्हाइस Android ऑपरेटिंग सिस्टमवर काम करते. हा स्मार्ट टीव्ही डॉल्बी ऑडिओ, एचडीआर १० आणि गुगल असिस्टंटला सपोर्ट करतो. हा स्मार्ट टीव्ही Voot, ZEE5, Alt Balaji, Sun NXT, Hungama Play, Eros Now, Jio Cinema आणि Sonyliv यासह अॅप्सना सपोर्ट करतो. या स्मार्ट टीव्हीची किंमत १४,४९९ रुपये आहे.

Micromax 24-inch Smart LED TV
Micromax 24-inch Smart LED TV

या मायक्रोमॅक्स स्मार्ट टीव्हीमध्ये २४ इंच एलईडी डिस्प्ले आहे, ज्याचे रिझोल्यूशन १३६६ x ७६८ पिक्सेल आहे. या स्मार्ट टीव्ही मध्ये ४GB रॅम आणि ५१२ GB स्टोरेज आहे. हे डिव्हाइस Android ५.१ ऑपरेटिंग सिस्टमवर काम करते. या व्यतिरिक्त, युजर्स क्लाउड टीव्ही अॅप स्टोअर वरून अॅप्स डाउनलोड करू शकतात. हा टीव्ही नेटफ्लिक्स, प्राइम व्हिडिओ, हॉटस्टार, ZEE5, डिस्ने + हॉटस्टार आणि यूट्यूबसह अनेक अॅप्सना सपोर्ट करतो. या स्मार्ट टीव्हीची किंमत १२,४९९ रुपये आहे.

Motorola 32-inch HD ready Smart LED TV
Motorola 32-inch HD ready Smart LED TV

मोटोरोलाने ३२ इंच एचडी रेडी एलईडी डिस्प्ले यात दिला आहे, ज्याचे रिझोल्यूशन १३६६x७६८ पिक्सेल असून टीव्ही अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टमवर काम करतो. हे डिव्हाइस नेटफ्लिक्स, Amazon प्राइम व्हिडिओ, डिस्ने + हॉटस्टार आणि यूट्यूबसह इन-बिल्ट अॅप्ससह सुसज्ज आहे. इतर वैशिष्ट्यांमध्ये स्क्रीन कास्टिंग आणि स्मार्ट व्ह्यूचा समावेश आहे. डिव्हाइस क्वाड-कोर प्रोसेसर वर काम करते. किंमतीबद्दल बोलायचे झाले तर या स्मार्ट टीव्हीची किंमत १३,९९९ रुपये आहे.

from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3o0b2YW