Full Width(True/False)

हे काय ! लाँचच्या आधीच Oppo K9 Pro कंपनीच्या वेबसाईटवर लिस्ट, फीचर्सही लीक, पाहा डिटेल्स

नवी दिल्ली : स्मार्टफोन चीनमध्ये २६ सप्टेंबर रोजी लाँच करण्यात येणार असून फोनच्या लाँच डेट आधीच हँडसेटचे सर्व स्पेसिफिकेशन्स चीनमधील कंपनीच्या वेबसाइटवर लिस्ट झाले आहेत. कंपनीने Weibo वर स्मार्टफोनची अनेक पोस्टर्स देखील शेअर केली आहेत, ज्यात काही स्पेसिफिकेशन्स संबंधी माहिती समोर आली आहे. माहितीनुसार, हँडसेटमध्ये १२० Hz रिफ्रेश रेटसह डिस्प्ले असू शकतो, जो HDR10 सपोर्टसह येईल. तसेच, हँडसेटमध्ये MediaTek Dimensity १२०० प्रोसेसर मिळण्याची अपेक्षा देखील आहे. पाहा डिटेल्स. वाचा: Oppo K9 Pro: वैशिष्ट्ये लाँचच्या आधीच Oppo K9 Pro चे अनेक स्पेसिफिकेशन्स वीबोवर पोस्टद्वारे कन्फर्म झाले असून ऑफिशियल वेबसाइटच्या लिस्टिंगनुसार, Oppo K9 Pro मध्ये ६.४३ इंचाचा AMOLED डिस्प्ले असेल ज्याचा १२० Hz रिफ्रेश रेट असेल. तसेच, फोनमध्ये MediaTek Dimensity १२०० प्रोसेसर दिला जाईल. आगामी Oppo K9 Pro मध्ये ४५०० mAh ची बॅटरी असेल. जी, ६० W सुपर फ्लॅश फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल. Oppo ने हे देखील कन्फर्म केले आहे की, हँडसेट स्मार्ट पाच-कोर सुरक्षा संरक्षणासह येईल. जे रात्रभर चार्जिंग दरम्यान फोनची सुरक्षा सुनिश्चित करेल. फोटोग्राफीसाठी ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप : फोटोग्राफीसाठी Oppo K9 Pro मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. परंतु, सेन्सरचा तपशील कंपनीने अद्याप शेअर केलेला नाही. या स्मार्टफोनमध्ये कनेक्टिव्हिटीसाठी, वाय-फाय ६, 5G आणि एनएफसी सारखी वैशिष्ट्ये उपलब्ध असतील. Oppo K9 Pro प्रोची जाडी ८.५ मिमी आणि वजन १८० ग्रॅम आहे. Oppo K9 Pro स्मार्टफोनसोबतच कंपनी २६ सप्टेंबर रोजी Oppo Smart TV K9 (75-inch Edition) आणि Oppo Watch Free देखील लाँच करणार असून कंपनीने यापूर्वीच Weibo वर अनेक टीझर रिलीज करून लाँचबद्दल कन्फर्म केले आहे . Oppo Watch Free ला आयताकृती डिझाइन आणि रबरचा पट्टा मिळेल तर, Oppo Smart TV K9 मध्ये ७५ इंचाचा डिस्प्ले असेल. Oppo K9 Pro चीनमध्ये २६ सप्टेंबर रोजी भारतीय वेळेनुसार दुपारी २.३० वाजता लाँच करण्यात येणार असल्याची माहिती Weibo वर, कंपनीने टीझर पोस्टरद्वारे दिली होती. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3AH7sX3