नवी दिल्लीः ओप्पो चीनमध्ये २६ सप्टेंबर रोजी आपला K9 Pro स्मार्टफोन लाँच करणार आहे. कंपनी एका इव्हेंट मध्ये या स्मार्टफोनवरून पडदा हटवणार आहे. आता कंपनीने हे स्पष्ट केले आहे की, या इव्हेंट मध्ये आणखी एक प्रोडक्ट सुद्धा लाँच करणार आहे. कंपनीने आधीच यावर्षी मार्चमध्ये Oppo Smart TV K9 सीरीज मध्ये तीन मॉडल्स लाँच केले होते. या टीव्हीला ४३ इंच, ५५ इंच, आणि ६५ इंचाच्या स्क्रीन साइजमध्ये उपलब्ध करण्यात आले होते. आता या सीरीज मध्ये कंपनी टॉप अँड ७५ इंच इंच डिस्प्ले व्हेरियंट आणणार आहे. ७५ इंचाचा ओप्पो स्मार्ट टीव्ही के ९ च्या लाँचिंग संबंधी एक टीझर कंपनीने शेयर केले आहे. या टीजरवरून खुलासा झाला आहे की, डिव्हाइस १.०७ बिलियन कलर्स सपोर्ट करणार आहे. या नवीन टीव्हीत सुद्धा या सीरीज मध्ये आलेल्या जुन्या मॉडल्सच्या स्पेसिफिकेशन्स मिळण्याची शक्यता आहे. हा टीव्ही HDR10+ आणि ब्लू लाइट प्रोटेक्शन सारखे फीचर्स सपोर्ट करणार आहे. डिव्हाइस मध्ये मीडियाटेक MT9652 चिपसेट दिला जाणार आहे. ग्राफिक्ससाठी ARM माली-G52 MC1 GPU सपोर्ट मिळणार आहे. सॉफ्टवेयर मध्ये स्मार्ट टीव्हीत कलर ओएस टीव्ही २.० ऑपरेटिंग सिस्टम सोबत येईल. जो अँड्रॉयड वर बेस्ड आहे. टीव्हीत १६ जीबी इनबिल्ट स्टोरेज, वाय फाय, आणि ब्लूटूथ ५.० कनेक्टिविटी सारखे ऑप्शनचा सपोर्ट मिळणार आहे. ओप्पोच्या नवीन ७५ इंच टीव्हीत ब्लूटूथ व्हाइस आणि NFC सपोर्टचा रिमोट कंट्रोल सपोर्ट मिळेल. ओप्पोच्या या टीव्हीत Xiaobu AI असिस्टेंट मिळेल. ओप्पोच्या या टीव्हीची किंमत अजून उघड करण्यात आली नाही. २६ सप्टेंबर रोजी याची किंमत उघड होणार आहे. वाचा: वाचा: वाचा: वाचा:
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2XUGNYC