Full Width(True/False)

VI ने भारतात लाँच केले दोन जबरदस्त रिचार्ज प्लान, अनलिमिटेड कॉलिंगसह Disney Plus Hotstar चे फ्री सब्सक्रिप्शन

नवी दिल्लीः वोडाफोन आयडिया () ने जास्तीत जास्त युजर्संना आपल्या सोबत जोडण्यासाठी दोन प्रीपेड प्लान लाँच केले आहेत. यासोबत Disney Plus Hotstar चे सब्सक्रिप्शन फ्री दिले जाणार आहे. या प्रीपेड पॅकची किंमत अनुक्रमे ७०१ रुपये आणि ९०१ रुपये आहे. या दोन्ही प्लानमध्ये युजर्संना डिज्नी प्लस हॉटस्टारचे सब्सक्रिप्शन शिवाय अनलिमिटेड कॉलिंग आणि हाय स्पीड डेटा मिळेल. तसेच या प्लानमध्ये विकेंड डेटा रोलओव्हर आणि बिंज ऑल नाइटची सुविधा दिली जाणार आहे. या सेवे अंतर्गत युजर्स रात्री १२ वाजेपासून सकाळी ६ वाजेपर्यंत कोणत्याही अतिरिक्त चार्ज शिवाय हाय स्पीड इंटरनेटचा वापर करू शकतील. Vi चा ७०१ रुपयाचा रिचार्ज प्लान वोडाफोन आयडियाचा हा रिचार्ज प्लान रोज ३ जीबी डेटा सोबत (अतिरिक्त ३ जीबी डेटा) आणि १०० एसएमएस ऑफर करतो. यासोबतच प्रीपेड प्लानमध्ये अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळते. याशिवाय, या प्लानमध्ये Disney Plus Hotstar सब्सक्रिप्शन सोबत विकेंड डेटा रोलओव्हर, व्हीआय मूव्ही, आणि लाइव्ह टीव्हीचे अॅक्सेस दिले जाणार आहे. या डेटाची वैधता ५६ दिवसाची आहे. Vi चा ९०१ रुपयाचा रिचार्ज प्लान वोडाफोन आयडियाचा हा रिचार्ज प्लान ७०१ रुपयाचा डेटा पॅक प्रमाणे आहे. या पॅकमध्ये रोज ३ जीबी डेटा (अतिरिक्त ४८ जीबी डेटा) आणि १०० एसएमएस दिले जाते. यासोबतच प्लानमध्ये Disney+ Hotstar चे सब्सक्रिप्शन, विकेंड डेटा रोलओवर, व्हीआय मूव्ही आणि लाइव्ह टीव्हीचे अॅक्सेस मिळते. याशिवाय, युजर्संना कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा दिली जाते. तर या पॅकची वैधता ८४ दिवसाची आहे. तुमच्यासाठी माहितीसाठी वोडाफोन आयडियाकडे आधीच ५०१ रुपये, ६०१ रुपये आणि २५९५ रुपयाचे प्लान्स आहेत. ज्यात Disney+ Hotstar चे सब्सक्रिप्शन दिले जाते. ५०१ रुपयाच्या प्लानमध्ये ३ जीबी डेटा, अनलिमिटेड कॉलिंग, व्हीआय मूव्ही, लाइव्ह टीव्ही आणि २८ दिवसाची वैधता दिली जाते. ६०१ रुपयाच्या प्रीपेड पॅकमध्ये ५६ दिवसाची वैधतेसोबत ७५ जीबी डेटा मिळतो. तर व्हीआयचा सर्वात महागडा २५९५ रुपयाचा प्लान मध्ये रोज १.५ जीबी डेटा आणि फ्री कॉलिंगची सुविधा दिली जाते. या पॅकची वैधता एक वर्षाची आहे. वाचा: वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3AF0SQS