Full Width(True/False)

धक्कादायक ! Acer इंडियाचे सर्व्हर हॅक, युजर्सचा संवेदनशील डेटा हॅकर्सच्या हाती, पाहा डिटेल्स

नवी दिल्ली : जर तुम्ही लॅपटॉप वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. तैवानची लॅपटॉप कंपनी Acer तर्फे कन्फर्म करण्यात आले आहे की युजर्सचा डेटा Acer च्या भारतीय डेटाबेसमधून झाला ब्रीच आहे. Acer ने कबूल केले की, कंपनीचे भारतातील सर्व्हर हॅक झाले होते आणि या दरम्यान ६० GB युजर डेटा चोरी गेला. लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे Acer च्या डेटाबेसमध्ये या वर्षातील ही दुसरी हॅकिंग आहे. वाचा: डेसोर्डेन नावाच्या गटाने या हॅकिंगची जबाबदारी घेतली असून या ग्रुपने Acer च्या सेवांमधून वैयक्तिक ग्राहकांची माहिती, कॉर्पोरेट ग्राहकांचा डेटा आणि संवेदनशील युजर माहिती गोळा केल्याचा दावा केला आहे. कंपनीचे म्हणणे आहे की, भारतातील त्यांच्या लोकल आफ्टर सेल सर्विस सिस्टमवरून हा Attack डिटेक्ट झाला. यानंतर, कंपनीने संपूर्ण प्रणालीचे पूर्ण स्कॅन केले आणि सुरक्षा प्रोटोकॉल सक्रिय केले. या हॅकिंगमुळे प्रभावित झालेल्या युजर्सना याबद्दल माहिती दिली जात असल्याचे कंपनीने म्हटले आहे. कंपनीने असेही म्हटले आहे की, इंडिन कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीमने या हल्ल्याबाबत कंपनीला माहिती दिली आहे. हॅकर ग्रुपने एक व्हिडिओही पोस्ट केला आहे. या गटाने १० हजार भारतीय युजर्सचा डेटा असलेल्या फायली आणि डेटाबेस देखील पोस्ट केले आहेत. या हॅकर गटाने असा दावा केला आहे की, त्यांनी भारतातील सुमारे ३,००० एसर रिटेलर्स आणि वितरकांचे लॉगिन तपशील देखील मिळवले आहेत. या हॅकर ग्रुपने ZDNet पोर्टलला स्वतः या हॅकिंगबद्दल माहिती देत दावा केला की त्यांना आता हजारो भारतीय एसर युजर्सच्या डेटामध्ये प्रवेश आहे. मात्र, हा रॅन्समवेअर अटॅक नसल्याचे हॅकर ग्रुपतर्फे सांगण्यात आले. कारण, इथे खंडणीची मागणी करण्यात आली नाही. या प्रकरणाची चौकशी केली जात असल्याचे एसरतर्फे सांगण्यात आले आहे. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2XgCmqE