नवी दिल्ली : सरकारी मालकीची नेटवर्क प्रोव्हाइडर कंपनी बीएसएनएलने गेल्यावर्षी ऑक्टोबरमध्ये काही लाँच केले होते. मात्र, त्यावेळी हे केवळ प्रमोशनल बेसिसवर उपलब्ध होते. मात्र आता फायबर बेसिक, फायबर वॅल्यू, फायबर प्रीमियम आणि फायबर अल्ट्रासह सर्व टेलिकॉम सर्कल्समध्ये उपलब्ध आहे. वाचाः यूजर्सला ब्रॉडबँड प्लॅनच्या किंमती एवढीच रक्कम सिक्योरिटी डिपॉजिट द्यावे लागेल. यूजर्सला वार्षिक, २ वर्ष आणि ३ वर्ष असे पेमेंट पर्याय मिळतो. यूजर्सने १२ महिन्यांसाठी पैसे दिल्यास १३ महिने लाभ घेता येईल. २४ महिन्यांचे पेमेंट केल्यास २७ महिने आणि ३६ महिन्यांचे पेमेंट केल्यास ४० महिने लाभ घेता येईल. Bharat Fibre चा ४४९ रुपयांचा ब्रॉडबँड प्लॅन या प्लॅनमध्ये यूजर्सला ३० Mbps च्या स्पीडने ३.३ TB म्हणजे ३,३०० जीबी FUP लिमिटपर्यंत डेटा मिळतो. हा डेटा समाप्त झाल्यानंतर इंटरनेट स्पीड २ Mbps पर्यंत कमी होईल. या प्लॅनमध्ये यूजर्सला सर्व भारतात अनलिमिटेट वॉइस कॉलिंगची सुविधा मिळते. यूजर्स ६ महिन्यानंतर थेट ५९९ रुपयांच्या प्लॅनमध्ये मायग्रेट होऊ शकतात. BSNL चा ५९९ रुपयांचा ब्रॉडबँड प्लॅन या प्लॅनमध्ये ग्राहकांना ६० Mbps च्या स्पीडने इंटरनेट मिळते. लिमिट पूर्ण झाल्यानंतर २ Mbps स्पीड मिळेल. तसेच, अनलिमिटेड वॉइस कॉलिंगची सुविधा मिळते. BSNL Bharat Fibre चा ७९९ रुपयांचा ब्रॉडबँड प्लॅन ७९९ च्या ब्रॉडबँड प्लॅनमध्ये १०० Mbps स्पीडने ३३०० जीबी डेटा मिळतो. FUP लिमिट पूर्ण झाल्यानंतर २ एमबीपीएस स्पीडने इंटरनेट वापरू शकता. याशिवाय, प्लॅनमध्ये अनलिमिटेड वॉइस कॉलिंगचा फायदा मिळतो. बीएसएनएलचा ९९९ रुपयांचा ब्रॉडबँड प्लॅन या प्लॅनमध्ये ग्राहकांना २०० Mbps स्पीडने ३३०० जीबी लिमिटपर्यंत डेटा मिळेल. याशिवाय अनलिमिटेड कॉलिंगची देखील सुविधा मिळते. तसेच, Disney+ Hotstar चे प्रीमियम सबस्क्रिप्शन मिळेल. BSNL चा १,४९९ रुपयांचा ब्रॉडबँड प्लॅन १,४९९ रुपयांच्या प्लॅनमध्ये ३०० Mbps स्पीडने ४००० जीबी पर्यंत डेटा मिळतो. तसेच, अलिमिटेड वॉइस कॉलिंग आणि Disney+ Hotstar चे प्रीमियम सबस्क्रिप्शन मिळते. वाचाः वाचाः वाचाः
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3lLm0zE