नवी दिल्ली : , आणि स्मार्टवॉचला आज भारतात लाँच केले जाणार आहे. GTS 3 आणि GTR 3 Pro वॉच व च्या अधिकृत वेबसाइट उपलब्ध आहे. तर GTR 3 ला Flipkart आणि in.amazfit.com वरून खरेदी करू शकता. एवढेच नाही तर Amazfit २०, २१ आणि २२ ला वॉच खरेदीवर १ हजार रुपये सूट देईल. वॉचमध्ये हेल्थ मॉनिटरिंग सिस्टम मिळेल. ज्यात २४x७ हार्ट रेट मॉनिटरिंग, ब्लड ऑक्सिजन सॅच्यूरेशन मॉनिटरिंग, स्लीप ट्रॅकिंग सारखे फीचर्स मिळतील. वाचा: Amazfit GTR 3 Pro, Amazfit GTR 3, Amazfit GTS 3 ची किंमत: Amazfit GTR 3 ची माहिती लिस्टिंगमधून मिळाली असून, याची किंमत १८,९९९ रुपये आहे. जागतिक बाजारातील किंमत सांगायची तर तिन्ही वॉचची किंमत २९९.९९ डॉलर्सपासून सुरू होते. Amazfit GTR 3 Pro ची किंमत २९९.०० डॉलर्स (जवळपास २२,५०० रुपये), vanilla Amazfit GTR 3 आणि Amazfit GTS ची किंमत १७९.९९ डॉलर्स (जवळपास १३,५०० रुपये) आहे. त्यामुळे भारतात देखील जवळपास याच किंमतीत वॉच उपलब्ध होण्याची शक्यता आहे. Amazfit GTR 3 Pro, Amazfit GTR 3, Amazfit GTS 3 चे फीचर्स: Amazfit GTR 3 Pro मध्ये १.४५ इंचाचा अल्ट्रा-एचडी एमोलेड टच डिस्प्ले दिला आहे. तर vanilla Amazfit GTR 3 मध्ये १.३९ इंच एचडी एमोलेड टच डिस्प्ले आणि Amazfit GTS 3 मध्ये स्क्वेअर १.७५ इंच एचडी एमोलेड टच डिस्प्ले दिला आहे. तिन्ही स्मार्टवॉचेसमध्ये पीक ब्राइटनेस १००० निट्स आणि अँटी-फिंगरप्रिंट कोटिंगसह टेम्पर्ड ग्लास दिला आहे. वॉच Zepp OS वर काम करते. नई Amazfit स्मार्टवॉचेजमध्ये २४x७ हार्ट रेट मॉनिटरिंग, SpO२ मॉनिटरिंग, स्ट्रेस, स्लीप, PAI हेल्थ असेसमेंट सारखे हेल्थ फीचर्स दिले आहेत. यात १५० स्पोर्ट्स मोड मिळतात. यात आउटडोर रनिंग, इंडोर वॉकिंग, ट्रेडमिल, आउटडोर सायकलिंग, रोविंग मशीन, एलिपटिकल आणि स्विमिंगचा समावेश आहे. तिन्ही वॉच वॉटर रेसिस्टेंट असून, ५ATM पाण्यात सुरक्षित राहतात. Amazfit GTR 3 Pro मध्ये ४५० एमएएचची बॅटरी दिली आहे, जी सिंगल चार्जमध्ये १२ दिवस टिकते. Amazfit GTR 3 ची बॅटरी २१ दिवस टिकते. तर Amazfit GTS 3 मध्ये २५० एमएएचची बॅटरी दिली असून, सिंगल चार्जमध्ये १२ दिवस टिकते. वाचा: १ वाचा: वाचा:
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3DUhRQg