Full Width(True/False)

Apple Watch चा कूल लूक मिळवा स्वस्तात, 'या' मॉडेल्सवर मिळताहेत जबरदस्त डील्स, पाहा ऑफर्स

नवी दिल्ली: अॅमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेल सर्व ग्राहकांसाठी लाईव्ह झाला असून आता सर्व नॉन-प्राइम सदस्य डील्स आणि सवलतींचा लाभ घेण्यास सक्षम असतील. दरवर्षी Amazon आणि फ्लिपकार्टसह ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म दिवाळीपूर्वी त्यांची विक्री वाढवण्यासाठी मेगा सेल इव्हेंट आयोजित करत असते. ज्यात, स्मार्टफोन, स्मार्ट घड्याळे, लॅपटॉप, साउंडबार, होम डिव्हाइसेस सारख्या श्रेणींवर बंपर सौदे आणि सवलत दिली जाते. वाचा: Amazon वर iPhone 11, iPhone XR Redmi NOte 10 Pro आणि Plus सह काही लोकप्रिय स्मार्टफोनवर सूट देखील देण्यात येत आहे. स्मार्टफोन व्यतिरिक्त, अॅमेझॉन आणि 6 वर सूट देखील देत आहे. येथे संपूर्ण तपशील जाणून घ्या. Apple Watch SE १९,९९९ रुपयांमध्ये उपलब्ध : Apple Watch SE Amazon वर १९,९९९ रुपयांमध्ये उपलब्ध आहे. गेल्या वर्षी लाँच करण्यात आलेली स्मार्टवॉच आतापर्यंतच्या सर्वात कमी किमतीत विकण्यात येत आहे. Apple Watch SE ज्याला परवडणारे Apple वॉच म्हणून ओळखले जात होते, त्याची किंमत ४० एमएम आवृत्तीसाठी आधी २९,९९९ रुपये होती. तुम्ही ICICI बँक किंवा Axis Bank कार्डधारक असल्यास, तुम्हाला १० % अतिरिक्त सूट मिळू शकते. Watch वॉच एसई मोठ्या रेटिना ओएलईडी डिस्प्लेसह येतो जी सीरीज ६ पेक्षा २x उजळ असल्याचे मानले जाते. वॉच एसई ४० mm आणि ४४ mm प्रकारांसह दोन भिन्न प्रकारांमध्ये उपलब्ध आहे. ४४ mm व्हेरिएंटची किंमत २३,९०० रुपये आहे. जर तुम्हाला विकत घ्यायचे असेल. तर, Amazon पेक्षा चांगले ठिकाण असू शकत नाही. Apple Watch 6 ४० मिमी व्हेरिएंट ३९,९०० रुपयांमध्ये उपलब्ध असून हे स्मार्टवॉचच्या जीपीएस + सेल्युलर आवृत्तीसाठी आहे. ४४ mm वेरिएंट ४७,९०० रुपयांना उपलब्ध आहे. Apple Watch 6 ६ रंगांमध्ये सादर करण्यात आली असून आयसीआयसीआय बँक आणि अॅक्सिस बँक कार्डधारक अतिरिक्त १० % सूट यावर मिळवू शकतात. Watch 6 एलटीई सपोर्टसह येते. म्हणजेच तुम्ही फोनशिवाय आणि आपल्या रिस्टवरच कॉल, मजकूर आणि सूचना प्राप्त करू शकता. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3l7ZkcG