Full Width(True/False)

Amazon चे बेस्ट गिफ्ट ! OnePlus च्या 'या' स्मार्टफोनर तब्बल २०,०८७ रुपयांपर्यंत ऑफर्स, पाहा डिटेल्स

नवी दिल्ली: अमेझॉनच्या Amazon Great Indian Festival ची सुरुवात अनेक जबरदस्त ऑफर्सने झाली असून दरम्यान, स्मार्टफोनच्या खरेदीवर ४० टक्के सूट दिली जात आहे. या व्यतिरिक्त, HDFC डेबिट किंवा क्रेडिट कार्ड आणि EMI वापरण्यावर १० % ची त्वरित सूट देखील असेल. अॅमेझॉन OnePlus सह हाय-एंड स्मार्टफोनवर अनेक ऑफर देखील देत आहे. वाचा: वर मोठी सवलत : OnePlus 9R 5G ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेजची MRP ३९,९९९ रुपये असून सेलमध्ये तुम्ही हा फोन ३६,९९९ रुपयांमध्ये म्हणजेच ३,००० रुपयांच्या सूटसह खरेदी करू शकता. मानक EMI अंतर्गत फोनसाठी किमान EMI १,७४२ रुपये आहे. त्याच वेळी, एचडीएफसी बँकेच्या क्रेडिट कार्डद्वारे पेमेंट केल्यावर २,००० रुपयांची त्वरित सूट दिली जाईल. यासोबतच २०,०८७ रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफरही यावर दिली जात आहे. १२ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेजची MRP ४३,९९९ रुपये असून ३,००० रुपयांच्या सूटसह तो तुम्ही ४०,९९९ रुपयांमध्ये खरेदी करू शकता. OnePlus 9R ची वैशिष्ट्ये: OnePlus 9 प्रीमियम डिझाइनसह एक उत्कृष्ट स्मार्टफोन आहे. यात स्नॅपड्रॅगन ८७० चिपसेट आहे. हे डिव्हाइस Android ११ वर आधारित OxygenOS ११.२.४.४ वर काम करते. त्याची रचना हाय-एंड मॉडेल OnePlus 9आणि OnePlus 9 Pro सारखीच आहे. चांगल्या गेमिंग अनुभवासाठी या स्मार्टफोनमध्ये काही नवीन गेमिंग वैशिष्ट्ये देखील जोडली गेली आहेत. यात ६.५५ इंचाचा AMOLED पॅनल डिस्प्ले १२० Hz उच्च रिफ्रेश रेटसह आहे. डिस्प्ले sRGB आणि DCI-P3 कलर स्पेस ला सपोर्ट करतो. फोनच्या क्वाड रियर कॅमेरा सेटअपमध्ये OIS सह ४८ मेगापिक्सलचा प्राथमिक लेन्स, दुसरा १६ मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड लेन्स, तिसरा ५मेगापिक्सेलचा मॅक्रो सेन्सर आणि चौथा २ मेगापिक्सेलचा मोनोक्रोम लेन्स आहे. तसेच सेल्फीसाठी १६ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. OnePlus 9R हे 5G डिव्हाइस असून त्याची बॅटरी ४५०० mAh ची आहे आणि साधारणपणे दिवसभर टिकते. OnePlus चे ६५ W चार्जर केवळ ३९ मिनिटांत फोन पूर्णपणे चार्ज करते. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2YgZPYP