Full Width(True/False)

Amazon Sale मध्ये होईल हजारो रुपयांची बचत, Asus च्या गेमिंग लॅपटॉपवर बंपर सूट; मिळेल १० तासांची बॅटरी लाइफ

नवी दिल्ली : अ‍ॅमेझॉनवर ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेल सुरू असून, ग्राहकांना अनेक प्रोडक्ट्सवर आकर्षक ऑफर्स आणि डील्सचा लाभ मिळत आहे. ब्रँड्स दररोज नवीन प्रोडक्ट्सवर शानदार ऑफर्स देत आहेत. मध्ये Laptops आणि वर देखील बंपर डिस्काउंट मिळत आहे. वाचा: Laptop आसुसच्या या लॅपटॉपची किंमत ८३,९९० रुपये आहे. हा एक शानदार गेमिंग असून, यात GTX १६५० ग्राफिक्स कार्ड दिले आहे. सेलमध्ये या लॅपटॉपला तुम्ही ५७,९९० रुपयात खरेदी करू शकता. गेमिंग लॅपटॉपद्वारे गेमर्स आपल्या आवडीची कोणतीही गेम सहज खेळू शकतात. यात मिळणाऱ्या स्पेसिफिकेशन्समुळे गेम्स खेळताना दुप्पट आनंद मिळेल. फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स या लॅपटॉपमध्ये १४४ हर्ट्ज रिफ्रेश रेटसह येणारा १५.६ इंच LED-बॅकलिट FHD डिस्प्ले दिला आहे. यामध्ये इंटेल कोर i५-१०३००H प्रोसेसर असून, याचा बेस स्पीड २.५GHz आणि पीक स्पीड ४.५ GHz आहे. या गेमिंग लॅपटॉपमध्ये ८ जीबी DDR४ मेमरी, विंडोज आणि फाइल स्टोर करण्यासाठी ५१२जीबी SSD, Nvidia GeForce GTX १६५० ग्राफिक्स कार्डसह ४GB VRAM मिळेल. या लॅपटॉपला विंडोज ११ मध्ये अपग्रेड करू शकता. Asus TUF Gaming F15 लॅपटॉपमध्ये दोन USB ३.२ Gen १ पोर्ट, एक USB २.० कनेक्टर, DisplayPort, HDMI, Ethernet LAN, Wi-Fi ६ आणि एक ३.५ मिमी हेडफोन/मायक्रोफोन कॉम्बो जॅक दिला आहे. कीबोर्ड देखील बॅकलिट आहे. डिस्प्लेवर ७२०पी चा वेबकॅम मिळतो. Asus TUF Dash F15 ची बॅटरी शानदार असून, १० तास टिकते. Asus TUF Gaming F15 वर गेमर्स Call of Duty: Cold War आणि Fortnite सारख्या गेम्स कोणत्याही समस्येशिवाय खेळू शकतात. Assassin’s Creed Valhalla आणि Forza Horizon 4 सारख्या गेम्स खेळण्यासाठी जास्त हेवी ग्राफिक कार्डची गरज पडते, या गेम्स देखील सहज खेळता येतील. आपल्या प्रमोशन ऑफरमध्ये लॅपटॉपसह Xbox Game Pass चा एक महिन्याचे सबस्क्रिप्शन देत आहे. लॅपटॉपमध्ये विंडोज १० वर १०० पेक्षा अधिक हाय-क्वालिटी गेम्स खेळता येतील. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3vu3C1A