Full Width(True/False)

जिओच्या या प्लानमध्ये २ रुपये जास्त खर्च करून मिळतोय ३६५ जीबी डेटा, जाणून घ्या डिटेल्स

नवी दिल्लीः ने देशात आपल्या युजर्ससाठी अनेक आकर्षक प्लान आणले आहे. ज्यात ग्राहकांना खूप सारा डेटा आणि फ्री कॉलिंगची सुविधा मिळते. जर रिलायन्स जिओचे प्रीपेड ग्राहक असाल तर तुम्हाला हे ऐकून आनंद वाटेल की, फक्त २ रुपये जास्त खर्च करून ३६५ जीबी अतिरिक्त डेटा मिळवता येवू शकतो. Reliance Jio च्या या दोन्ही प्लान्स मध्ये वर्षभराची वैधता मिळते. डेटा लिमिटमध्ये हे मार्केटमधील सर्वात चांगले प्लान आहेत. रिलायन्स जिओचा पहिला प्लान २ हजार ३९७ रुपयाचा आहे. तर दुसरा प्लान २ हजार ३९९ रुपयाचा आहे. २३९७ रुपयाच्या प्लानमध्ये युजर्संना फक्त ३६५ जीबी डेटा मिळतो तर २३९९ रुपयाच्या प्लानमध्ये एकूण ७३० जीबी डेटा मिळतो. याचाच अर्थ युजर्संना फक्त २ रुपये जास्त देवून ३६५ जीबी अतिरिक्त डेटा मिळतो. जाणून घ्या डिटेल्स. २३९९ रुपयाचा जिओ प्लान रिलायन्स जिओचा २३९९ रुपयाचा प्लान युजर्संना रोज २ जीबी हाय स्पीड डेटा ऑफर करतो. FUP लिमिट नंतर युजर्संना 64 kbps इंटरनेट अॅक्सेस मिळते. यात रोज डेटाची मॅक्सिमम लिमिट २ जीबी आहे. ३६५ दिवसांच्या वैधतेसह हा प्लान येतो. वर्षभरात एकूण ७३० जीबी डेटा मिळतो. युजर्संना १०० एसएमएस रोज मिळतात. अनलिमिटेड कॉल मिळते. एकूण डेटा ३६५ दिवसाची वैधता सोबत ७३० जीबी मिळते. तसेच युजर्संना जिओ अॅप्सचे फ्री सब्सक्रिप्शन मिळते. २३९७ रुपयाचा जिओ प्लान रिलायन्स जिओचा २३९७ रुपयाचा प्लान आपल्या युजर्संना एकूण ३६५ जीबी हाय स्पीड डेटा मिळतो. FUP लिमिट नंतर युजर्संना 64 kbps वर इंटरनेट अॅक्सेस मिळते. तसेच अनलिमिटेड व्हाइस कॉलिंगची सुविधा मिळते. प्लानची वैधता ३६५ दिवसाची आहे. या प्लानमध्ये डेली डेटाची कोणतीही लिमिट नाही. या प्लानसोबत ग्राहकांना अनलिमिटेड कॉलिंग सोबत अनलिमिटेड डेटाची सुविधा मिळते. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3C3U0wT