नवी दिल्लीः सप्टेंबर मध्ये विवोने अँड्रॉयड १२ ऐवजी अँड्रॉयड ११ वर बेस्ड फट टच ओएस १२ आणले आहे. कंपनीच्या मोबाइल ऑपरेटिंग सिस्टमचे लेटेस्ट व्हर्जन नवीन लाँच करण्यात आलेल्या विवो X70 सीरीज सोबत येते. बरोबर एक महिन्यांनंतर विवोने आता भारतात काही निवडक डिव्हाइसला मध्ये अपडेट करण्याचे ठरवले आहे. याचा खुलासा कंपनीने केला आहे. विवो इंडियाच्या अधिकृत ट्विटर अकाउंटच्या एका ट्विटनुसार, चिनी स्मार्टफोन निर्माता पुढील महिन्यात देशात ३१ हँडसेट्सला अँडॉयड १२ वर अपडेट करणार आहे. एलिजिबल डिव्हाइस मध्ये X, V, S, आणि Y सारख्या ब्रँड द्वारा विकणाऱ्या सर्व लाइनअपच्या प्रोडक्ट्सचा समावेश आहे. या ठिकाणी विवो स्मार्टफोन्सची यादी देण्यात आली आहे. ज्यात भारतात Android 12 अपडेट मिळणार आहे. पाहा संपूर्ण टाइमलाइन. नोव्हेंबर २०२१ च्या अखेरपर्यंत X70 Pro+ डिसेंबर २०२१ च्या अखेरपर्यंत vivo X60 Pro+ vivo X60 Pro vivo X60 vivo V21 vivo Y72 5G जानेवारी २०२२ च्या अखेरपर्यंत vivo X70 Pro vivo V21e vivo V20 2021 vivo V20 vivo Y21 vivo Y51A vivo Y31 मार्च २०२२ च्या अखेरपर्यंत vivo X50 Pro vivo X50 vivo V20 Pro vivo V20 SE vivo Y33s vivo Y20G vivo Y53s vivo Y12s एप्रिल २०२२ च्या सुरुवातीला vivo S1 vivo Y19 एप्रिल २०२२ च्या अखेर पर्यंत vivo V17 Pro vivo V17 vivo S1 Pro vivo Y73 vivo Y51 vivo Y20 vivo Y20i vivo Y30 हे अपडेट शेड्यूल फक्त बीटा रोलआउटसाठी आहे. वास्तविक स्टेबल रिलीज मध्ये थोडा वेळ लागू शकतो. या योजनेनुसार, विवो २०२२ च्या पहिल्या सहामाहीपर्यंत सर्व सपोर्टेड हँडसेटसाठी अँड्रॉयड १२ अपडेट रोलआउट देईल. वाचा: वाचा: वाचा: वाचा:
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3jqAJ1k