Full Width(True/False)

50MP मेन आणि 32MP चा सेल्फी कॅमेऱ्याचा स्मार्टफोन लाँच, डिस्प्ले आणि प्रोसेसर जबरदस्त

नवी दिल्लीः Huawei ने मार्केट मध्ये आपला नवीन स्मार्टफोन Nova 9 लाँच केला आहे. फोनला कंपनीने सध्या यूरोप मध्ये लाँच केले आहे. ची सुरुवातीची किंमत ४९९ यूरो जवळपास ४३ हजार ४०० रुपये आहे. कंपनी चीन प्रमाणे यूरोप मध्येही या फोनचे प्रो व्हेरियंटला सुद्धा लाँच करण्याची शक्यता होती परंतु, असे झाले नाही. हुवावे नोव्हा ९ मध्ये काय आहे खास, जाणून घ्या डिटेल्स. हुवावे नोव्हा ९ चे फीचर आणि स्पेसिफिकेशन फोनमध्ये कंपनी 120Hz च्या रिफ्रेश रेट सोबत 6.67 इंचाचा OLED डिस्प्ले देत आहे. कंपनीचा हा फोन ८ जीबी रॅम सोबत १२८ जीबी आणि २५६ जीबीचे इंटरनल स्टोरेज व्हेरियंट मध्ये आणले आहे. प्रोसेसर म्हणून कंपनी या फोन मध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ७७८ जी चिपसेट ऑफर करीत आहे. हुवावेचा हा हँडसेट एक 4G फोन आहे. तर या सोबत प्रोसेसर सोबत येणाऱ्या दुसऱ्या डिव्हाइसेज मध्ये कंपनी 5G मॉडम ऑफर करू शकते. हुवावे नोवा 9 मध्ये 5G न मिळाल्याच्या कारणामुळे चीन अमेरिका मध्ये सुरू असलेला वाद आहे. याच कारणामुळे हुवावे ग्लोबल मार्केटमध्ये 5G हँडसेट्स ऑफर करू शकत नाही. फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये एलईडी फ्लॅश सोबत चार रियर कॅमेरे दिले आहेत. यात ५० मेगापिक्सलचा अल्ट्रा व्हिजन मेन कॅमेरा सोबत एक ८ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल कॅमेरा, एक २ मेगापिक्सलचा मायक्रो कॅमेरा आणि एक २ मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर दिला आहे. सेल्फीसाठी फोनमध्ये ३२ मेगापिक्सलचा पंच होल कॅमेरा दिला आहे. फोनला पॉवर देण्यासाठी यात 4300mAh ची बॅटरी दिली आहे. ही बॅटरी ६६ वॉटचे फास्ट चार्जिंग सपोर्ट सोबत येते. ओएस म्हणून या फोनमध्ये EMUI 12 दिले आहे. वाचा: वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2ZmOWFM