Full Width(True/False)

Asus VivoBook 14 सह 'या' प्रीमियम Laptops वर मिळतोय २०,००० पर्यंतचा डिस्काउंट, पाहा पूर्ण लिस्ट

नवी दिल्ली : लाईव्ह असून यामध्ये, HP पासून Asus पर्यंतच्या लॅपटॉपवर प्रचंड सवलत दिली जात आहे. एवढेच नाही तर नो-कॉस्ट ईएमआय आणि एक्सचेंज ऑफर देखील या लॅपटॉपवर उपलब्ध आहेत. अशाप्रकारे, जर तुम्ही घरून किंवा ऑनलाइन क्लासमधून कामासाठी नवीन लॅपटॉप खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर या यादीमध्ये तुम्हाला काही निवडक लॅपटॉपची माहिती मिळेल, जे तुम्ही खूप कमी किंमतीत खरेदी करू शकाल. वाचा: किंमत: ४७,९९० रुपये (मूळ किंमत ६३,९९० रुपये) Asus VivoBook 14 मध्ये १४ इंच फुल-एचडी+ डिस्प्ले आहे, ज्याचे रिझोल्यूशन १,९२० x१,०८० पिक्सेल आहे. त्याचा आस्पेक्ट रेशियो १६: ९ आहे आणि पीक ब्राइटनेस २२० nits आहे. या लॅपटॉपमध्ये चांगल्या कामगिरीसाठी, i5 10 व्या पिढीचे प्रोसेसर, ८ GB रॅम आणि ५१२ GB SSD स्टोरेज देण्यात आले आहे. या व्यतिरिक्त युजर्सना लॅपटॉपमध्ये एक शक्तिशाली बॅटरी मिळेल, जी एकाच चार्जमध्ये ६ तासांचा बॅकअप देते. त्याचबरोबर हा लॅपटॉप विंडोज १० होमवर काम करतो. त्याची ऑपरेटिंग सिस्टम विंडोज ११ मध्ये अपग्रेड केली जाऊ शकते. : किंमत: ४७,९९० रुपये (मूळ किंमत ५६,७७६ रुपये) Dell 15 मध्ये १५.६ इंच फुल-एचडी+ अँटी-ग्लेअर डिस्प्ले आहे ज्याचे रिझोल्यूशन १,९२० १०८० पिक्सेल आहे. यात इंटेल कोर i3 ११ व्या पिढीचा प्रोसेसर देण्यात आला आहे. यात ८ GB DDR4 रॅम आणि २५६GB SSD स्टोरेज आहे. याशिवाय लॅपटॉपमध्ये एक मजबूत बॅटरी उपलब्ध असेल. Hp 15: किंमत: ३८,९०० रुपये (मूळ किंमत ४६,०५५ रुपये) HP 15 लॅपटॉपमध्ये १५.६ इंच फुल-एचडी+ डिस्प्ले आहे ज्याचे रिझोल्यूशन १,९२०x१०८०पिक्सेल आहे. त्याची पिक ब्राइटनेस २२० nits आहे. यात AMD Ryzen 3 3250U प्रोसेसर आहे. तसेच, यात ८ GB रॅम आणि २५६ GB SSD स्टोरेज मिळेल. याशिवाय, एचपी 15 लॅपटॉपमध्ये कनेक्टिव्हिटीसाठी वाय-फाय आणि सुपर स्पीड यूएसबी टाइप-सी पोर्ट सारखे फीचर्स देण्यात आले आहेत. Lenovo IdeaPad Slim 3 (AMD): किंमत: ३६,९९० रुपये (मूळ किंमत ४३,९९० रुपये) लेनोवो आयडिया पॅड स्लिम 3 लॅपटॉप १५.६ इंच एचडी डिस्प्लेसह येतो. याचे रिझोल्यूशन १,३६६ x७६८ पिक्सेल आहे. यात AMD Ryzen 3 3250U प्रोसेसर आहे, जे ते अधिक चांगले बनवते. या व्यतिरिक्त, वापरकर्त्यांना लॅपटॉपमध्ये मजबूत बॅटरीसह ८ GB DDR4 रॅम आणि २५६ GB स्टोरेज मिळेल. कंपनीचा दावा आहे की, त्याची बॅटरी एकाच चार्जमध्ये १० तासांचा बॅकअप देते. त्याची बॅटरी एका तासात ८० टक्के चार्ज होते. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3EaNCF3