नवी दिल्ली: स्मार्टफोनमध्ये अशा अनेक गोष्टी असतात ज्या अनेकांना माहीत नसतात किंवा माहीत असूनही युजर्स त्यांचा वापर करत नाही. आज आम्ही तुम्हाला अशाच एका भन्नाट फीचरबद्दल सांगणार आहोत. बरेचदा असे घडते की एखादा मित्र काही कामानिमित्त तुमचा फोन घेऊन जातो आणि मग त्यामध्ये डोकावू लागतो आणि तुमच्या संमतीशिवाय तुमच्या फोनचे अॅप्स देखील वापरण्यास सुरुवात करतो. पण, त्यावर एक उपाय आहे. तुमच्या फोनमध्येच असे एक वैशिष्ट्य आहे की तुमचा फोन चालू केल्यानंतर, तुमचा फोन अनलॉक असला तरीही, तुमच्या संमतीशिवाय कोणीही तुमचा फोन वापरू शकणार नाही. वाचा: यासाठी एक फीचर तुमची मदत करेल. पिन द स्क्रीन किंवा स्क्रीन पिनिंग असे या फीचरचे नाव आहे. यात जेव्हा तुम्ही एखाद्या अॅपला पिन करता तेव्हा त्या अॅपशिवाय दुसरा कोणताही पर्याय उघडत नाही. जाणून घेऊया या फीचरबद्दल. असे वापरा फीचर:
- यासाठी तुम्हाला फोनच्या सेटिंगमध्ये जावे लागेल.
- त्यानंतर तुम्हाला सिक्युरिटी आणि लॉक स्क्रीनचा पर्याय दिसेल.
- त्यावर क्लिक करावे लागेल. येथे तुम्हाला काही गोपनीयता संबंधित पर्याय दिसतील.
- यामध्ये तुम्हाला तळाशी Pin the किंवा Screen Pinning नावाचा पर्याय दिसेल.
- यावर टॅप करा. तुम्हाला ते चालू करावे लागेल. प्रत्येक फोनचे पर्याय वेगवेगळे असतात, त्यामुळे तुम्ही थेट सर्चमध्ये जाऊन हे फीचर शोधू शकता.
- वरील प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, तुम्हाला पिन करायचे असलेले अॅप उघडा आणि बंद करा.
- त्यानंतर वर जाऊन त्या app ला लॉंग प्रेस करा . त्यानंतर पिनचा पर्याय निवडा. यानंतर, या अॅपशिवाय, इतर कोणतेही अॅप उघडू शकणार नाही.
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3mlqzku