Full Width(True/False)

असा भाऊ कोणालाही न मिळो, विकी काैशल कपिल शर्माला असे का म्हणाला?

मुंबई : बॉलिवूड अभिनेता विकी काैशलचा चित्रपट 'सरदार उधम' येत्या 16 ऑक्टोबरला ओटीटी प्लेटफॉर्मवर रिलीज होणार आहे. त्यामुळे सध्या या विकी काैशलसह दिग्दर्शक व अन्य कलाकार या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन शूजीत सरकारने केले आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी ही टीम द कपिल शर्माच्या शोमध्ये दाखल झाली. यावेळी कपिलने दोघांशीही आपल्या विनोदी शैलीत गप्पा मारल्या. धमाल मस्ती करतानाचा व्हिडिओ होतोय व्हायरल या शोचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओच्या शेवटी दिसून येत आहे की, कपिल शर्मा, विकी काैशलला कॅटरिना कैफसोबतच्या रिलेशनविषयी विचारतो. अनेकदा कॅटरिना कैफच्या घराबाहेर अनेकदा दिसून आला आहे. अशातच कपिल शर्मा विकीला एका बातमीचा व्हिडिओ दाखवतो आणि विचारतो की, कॅटरिनाचे शेजारचे लोक दोघांना सोबत पाहत असतील अशी शक्यता आहे. त्यावर अर्चना पूरन सिंग म्हणते की, हो, पण यावेळी कपिल तू या दोघांमध्ये आग लावत असल्याचे दिसून येत आहे. कपिल म्हणतो की, मी नाही या शोचे लेखक अशी क्लिप दाखवून दोघांमध्ये आग लावत आहेत. त्यानंतर कपिल म्हणतो की, विकीसारखा भाऊ सर्वांना मिळो. त्यावर विकी काैशल त्वरित कपिलला म्हणतो की, कपिलसारखा भाऊ कोणालाही ना मिळो.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/306ELVT