Full Width(True/False)

iQOO ने हटवला ‘या’ बहुचर्चित स्मार्टफोनवरुन पडदा, ५०MP कॅमेऱ्यासह मिळेल पॉवरफुल बॅटरी

नवी दिल्ली : ने गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या ला चीनमध्ये लाँच केले आहे. या फोनमध्ये पंच-होल डिझाइन दिले आहे. रियर पॅनेलवर चा लोगो आहे. वैशिष्ट्यांबद्दल सांगायचे तर असलेल्या iQOO 8 Pro Pilot Edition मध्ये एलटीपी एमोलेड डिस्प्ले आणि इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर दिले आहे. यासोबतच ५० मेगापिक्सल ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आणि Snapdragon ८८८+ ५G प्रोसेसर मिळतो. वाचा: iQOO 8 Pro Pilot Edition चे फीचर कंपनीने iQOO 8 Pro Pilot Edition मध्ये पातळ बेझल, कर्व्ड एड्ज आणि इन-डिस्प्ले अल्ट्रासॉनिंग फिंगरप्रिंट सेंसर दिला आहे. या फोनमध्ये ६.७८ इंच क्यूएचडी प्लस E5 LTPO एमोलेड डिस्प्ले मिळतो. याचा रिफ्रेश रेट १२० हर्ट्ज आहे. यात डॉल्बी व्हिजन आणि एचडीआर१०+ सपोर्ट मिळतो. रियर पॅनेलवर ब्लॅक, रेड आणि ब्लू रंगाच्या स्ट्राइप आहेत. सोबतच, BMW M Motorsport चा लोगो आहे. मिळेल ५० मेगापिक्सल कॅमेरा iQOO 8 Pro Pilot Edition मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. याता मुख्य कॅमेरा ५० मेगापिक्सल आहे. सोबतच, ४८ मेगापिक्सल अल्ट्रा वाइड अँगल लेंस आणि १६ मेगापिक्सल टेलिफोटो सेंसर दिले आहे. सेल्फीसाठी फ्रंटला १६ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळतो. मिळेल Snapdragon ८८८+ ५G प्रोसेसर परफॉर्मेंससाठी फोनमध्ये स्नॅपड्रॅगन ८८८+ ५जी चिपसेट, १२ जीबी रॅम आणि ५१२ जीबी इंटर्नल स्टोरेज दिले आहे. पॉवरसाठी यात ४५०० एमएएचची बॅटरी दिली आहे, जी १२० वॉट वायर, ५० वॉट वायरलेस आणि १० वॉट रिव्हर्स वायरलेस फास्ट चार्जिंग सपोर्टसह येते. कनेक्टिव्हिटीसाठी यात वाय-फाय ६, ब्लूटूथ ५.२, एनएफसी आणि यूएसबी टाइप-सी पोर्ट दिले आहे. iQOO 8 Pro Pilot Edition ची किंमत iQOO 8 Pro Pilot Edition ची किंमत ५,९९९ चीनी युआन (जवळपास ६८,९०० रुपये) आहे. ही किंमत १२ जीबी रॅम आणि ५१२ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची आहे. फोनच्या भारतातील लाँचिंगबाबत अद्याप अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. या महिन्याच्या अखेरीस फोन भारतात लाँच होऊ शकतो. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3mdw0AW