नवी दिल्ली: काही दिवसातच दसरा आणि दिवाळीची तयारी भारतात सुरू होईल. या कालावधीत भारतात सर्वाधिक विक्री अपेक्षित असते. अशात दिवाळीपूर्वी काही उत्तम स्मार्टफोन, इअरबड्स आणि स्पीकर्स देखील भारतीय स्मार्टफोन बाजारात दाखल होणार आहेत. यामध्ये OnePlus आणि रिअलमीच्या स्मार्टफोनचे नाव समोर आले आहे. पाहा डिटेल्स. वाचा: : लाँच तारीख - १२ ऑक्टोबर, अपेक्षित किंमत - १२,००० रुपये स्मार्टफोनमध्ये एचडी+ रिझोल्यूशन, ९० हर्ट्ज रिफ्रेश रेट, तसेच सेल्फी कॅमेरासाठी पंच-होल डिझाइनसह ६.५ इंच एलसीडी स्क्रीन आहे. फोन ऑक्टा-कोर युनिसॉक T 700 प्रोसेसरसह येऊ शकतो. फोनला ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी इंटरनल स्टोरेज दिले जाऊ शकते. फोन अँड्रॉइड ११ वर आधारित असेल. फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. ज्यात, ४८ MP प्रायमरी सेन्सर आहे, ज्याला २ MP मॅक्रो कॅमेरा आणि २ MP डेप्थ सेन्सर सपोर्ट येतो. : लाँच तारीख - १३ ऑक्टोबर, अपेक्षित किंमत - ३५ ते ४० हजार रुपये OnePlus 9 RT मध्ये ६.५५ इंच फुल HD + AMOLED डिस्प्ले दिला जाऊ शकतो. हे डिव्हाइस १२० Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करेल. OnePlus 9RT स्मार्टफोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ८७० एसओसीसह सुसज्ज असेल. ६५ W फास्ट चार्जिंगसाठी सपोर्टसह फोनमध्ये समान ४५०० mAH बॅटरी असेल. फोनमध्ये १६ MP चा प्राथमिक कॅमेरा दिला जाईल. लाँच तारीख - १३ ऑक्टोबर, अपेक्षित किंमत - ३०,००० रुपये GT Neo 2 मध्ये Qualcomm Snapdragon 870 प्रोसेसर सपोर्ट देण्यात आला आहे. Realme GT Neo 2 मध्ये ६.६२ इंच फुल-एचडी+ सुपर AMOLED डिस्प्ले १२० Hz रिफ्रेश रेट असू शकतो. फोनला १२ GB रॅमचा सपोर्ट मिळेल. फोन ६४ MP ट्रिपल कॅमेरा सपोर्टसह येईल. फोनच्या समोर १६ एमपी कॅमेरा देण्यात आला आहे. ६५ W फास्ट चार्जिंग तंत्रज्ञानासह फोनमध्ये ५००० mAh ची बॅटरी आहे. लाँच तारीख - १३ ऑक्टोबर, अपेक्षित किंमत - २,५०० रुपये Realme Buds Air 2 हा वायरलेस इयरबड आहे. ज्यामध्ये, नॉइस केसिंग (ANC) सपोर्ट आहे. जे Realme द्वारे नवीन कलर व्हेरिएंट मध्ये लाँच केले जात आहे. कंपनी Realme Buds Air 2 मध्ये ग्रीन कलर ऑप्शन लाँच करू शकते. TWS आधीच क्लोजर व्हाईट, क्लोजर ब्लॅक आणि क्लोजर गोल्ड कलर ऑप्शन मध्ये उपलब्ध आहे. वाचा: वाचा: वाचा:
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3FrPsTr