मुंबई- लोकप्रिय बॉलिवूड अभिनेता याचा मुलगा याला मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या क्रुजमधून अटक करण्यात आली. क्रुजमध्ये अमली पदार्थांचं सेवन केल्याप्रकरणी एनसीबीने आर्यनला अटक केली. सध्या आर्यन इतर आरोपींसोबत आर्थर रोड कारागृहात आहे. शुक्रवारी आर्यनच्या जामिनावर न्यायालयात सुनावणी घेण्यात आली. परंतु, न्यायालयाने आर्यनचा जामीन अर्ज फेटाळला. अशात हिचा व्हिडीओ सोशल मीडियावर वायरल होतोय. गौरी आर्यनला भेटायला एनसीबी कोठडीत गेली होती तेव्हाचा व्हिडीओ असून या व्हिडीओत गौरी आपल्या मुलाची अवस्था पाहून हळवी झालेली दिसतेय. गुरुवारी गौरी एनसीबीच्या ताब्यात असलेल्या आर्यनला भेटायला गेली होती. व्हिडिओत गौरी एनसीबी कार्यालयाच्या बाहेर गाडीत बसली आहे. ती आर्यनला भेटून आली होती. गाडीत बसलेली गौरी आपल्या मुलाची अवस्था पाहून रडवेली झालेली पाहायला मिळाली. गाडीत बसून गौरी रडत आहे. तिने आपलं रडणं लपवण्यासाठी तोंडावर हात ठेवला आहे. परंतु, गालावर ओघळलेले अश्रू तिची स्थिती स्पष्टपणे सांगत आहेत. मुलाला तुरुंगात पाहून गौरी स्वतःला अडवू शकली नाहीये. थोड्या वेळातच शाहरुखची मॅनेजर पूजा ददलानी गाडीत येऊन बसते आणि त्या दोघी तिथून निघून जातात. आर्यनचा गुन्हा अजूनही सिद्ध व्हायचा आहे. परंतु, त्यापूर्वी गौरीची झालेली अवस्था पाहून नेटकरीही भावुक झाले आहेत. गौरीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड वायरल झाला आहे. नेटकरी या व्हिडिओवर संमिश्र प्रतिक्रिया देत आहेत. आर्यनला १४ दिवसांचा तुरुंगवास सुनावण्यात आला आहे. आर्यन सध्या मध्यवर्ती कारागृहात असून त्याला इतर कैद्यांप्रमाणेच वागणूक दिली जात आहे. आर्यनला इतर कैद्यांप्रमाणेच सगळ्या नियमांचं पालन करावं लागत आहे. आर्यनसोबत इतर पाच पुरुष आरोपींची रवानगी देखील याच कारागृहात करण्यात आली आहे.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3oMjP0E