मुंबई : टीव्हीवरील प्रसिद्ध रिअॅलिटी शो असलेल्या ''च्या चाहत्यांची प्रतीक्षा आता संपुष्टात आली आहे. 'बिग बॉस' चे १५ वं पर्व आजपासून म्हणजे २ ऑक्टोबर (शनिवारी) पासून सुरू झालं आहे. 'बिग बॉस १५' शोचा आज ग्रॅंड प्रीमिअर नाईट आहे. रात्री ९.३० वाजता प्रदर्शित केला जाणार आहे. या ग्रॅंड प्रीमिअर नाईट दरम्यान प्रेक्षकांना मनोरंजनाची मोठी मेजवाणी चाखता येणार आहे. पुन्हा एकदा या शोमध्ये सूत्रसंचालन करताना दिसून येणार आहे. 'बिग बॉस १५' च्या यंदाच्या पर्वाची थीम जंगलावर आधारित आहे, म्हणजे घरात जाण्याअगोदर स्पर्धकाला जंगलातून प्रवास करावा लागणार आहे. 'बिग बॉस'च्या घरात स्पर्धकाला आरामदायी जीवन जगण्याची संधी मिळते आणि यंदा घरातील सदस्य जंगलाच्या प्रवासाला निघणार आहे. चित्रपट निर्माते ओमंग कुमार व त्यांची पत्नी वनिता ओमंग कुमार यांनी 'बिग बॉस'च्या घराला एखाद्या जंगलाप्रमाणे डिझाईन केले आहे. 'बिग बॉस'च्या घराची सजावट यंदा जंगल थीमवर करण्यात आली आहे. घराच्या भिंतींवर प्राण्यांचे चित्र काढण्यात आले असून या भिंती फुलांच्या वॉलपेपरने सजवण्यात आल्या आहेत. संपूर्ण घर एखाद्या जंगलाप्रमाणे दिसून येत आहे. लिविंग रुममध्ये एक मोठा राजहंस बनवण्यात आला आहे. तर बेडरुममध्ये पंख दिसून येतात. यासोबतच घराच्या आतील भागात प्रकाशाकरिता खास व्यवस्था करण्यात आली आहे. 'बिग बॉस' च्या घराला यंदा जंगलाचे स्वरुप देण्यात आले आहे. या ठिकाणी हिरवेगार वृक्ष, हिरवेगार गवत आणि फांद्यावरील झोक्यांसोबतच गुप्त दरवाजे दिसून येतील. कमळाच्या फुलांनी सजलेला एक तलाव देखील दिसणार आहे. तर दुसरीकडे जंगलाच्या सोंदर्यात आणखी भर घालण्यासाठी एक वृक्ष देखील दिसणार आहे. हेच जंगल स्पर्धकांचे राहण्याचा व स्वयंपाक घराचा एक भाग आहे, ज्यामध्ये स्पर्धकांना सर्वाधिक वेळ व्यतीत करायचा आहे. घरातील बाथरुमसाठी बांबूचा वापर करण्यात आला आहे. 'बिग बॉस'च्या घरात येणाऱ्या सर्व स्पर्धकांना एक वेगळाच अनुभव मिळणार आहे. या पर्वामध्ये स्पर्धकांना वापरण्यासाठी आरामदायी सोफा व खूर्ची मिळणार आहे, ज्यावर अनेक रंगांचे कुशन असल्याचे दिसून येत आहे.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3is8Zcd