आजच्या काळात स्मार्टफोन कंपन्यांची संख्या खूप वाढली आहे आणि दररोज इतके स्मार्टफोन रिलीज होतात की प्रत्येक व्यक्तीच्या स्मार्टफोनच्या गरजा पूर्ण होतातच. स्मार्टफोन कंपन्या देखील युजर्सना सर्व फीचर्स मिळावे याकरिता विशेष प्रयत्नशील असतात. शिवाय, बजेट किमतीकडे देखील आजकाल बऱ्याच कंपन्या विशेष लक्ष देत आहेत. अशात ,तुम्ही देखील नवीन स्मार्टफोन खरेदीचा विचार करत असाल तर, या महिन्यात देखील अनेक फोन लाँच होणार आहेत. विशेष म्हणजे, गेल्या महिन्यात, सप्टेंबरमध्ये, iPhone 13 लाँच झाला, ज्याची अनेक लोक आतुरतेने वाट पाहत होते. सप्टेंबर नंतर आता आणखी बरेच फोन आहेत जे येत्या काळात बाजारात येऊ शकतात. तसेच, हे स्मार्टफोन चांगल्या किंमतीत खरेदी करण्यासाठी तुमच्याकडे विक्रीच्या अनेक संधीही येत आहेत. यातील काही स्मार्टफोन या तुम्ही महिन्यात खरेदी करू शकता. पाहा डिटेल्स.

OnePlus 9RT
वनप्लसचा हा लेटेस्ट One Plus RT स्मार्टफोन १५ ऑक्टोबरला रिलीज होऊ शकतो. याबद्दल फारशी माहिती समोर आलेली नाही, परंतु फीचर्स नक्कीच लीकद्वारे उघड झाली आहेत. क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ८७० चिपसेटवर चालणारा हा फोन ५० MP प्राथमिक कॅमेरा, १६ MP फ्रंट कॅमेरा आणि ८ GB रॅमसह सुसज्ज असेल. असे म्हटले जात आहे की, One Plus RT फोन ४,५०० mAh बॅटरी आणि ६५ W फास्ट चार्जिंग सपोर्टसह येऊ शकतो.
Samsung Galaxy S21 FE
अँड्रॉइड ११ वर चालणारा हा Samsung Galaxy S21 FE स्मार्टफोन २९ ऑक्टोबर रोजी लाँच केला जाऊ शकतो. फोन ६.४ इंच FHD+ Infinity -O डायनॅमिक AMOLED डिस्प्ले, १२० Hz रिफ्रेश रेट, ५G सेवा, इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनर, IP68 सर्टिफिकेशन (वॉटर रेसिस्टंट) आणि ६ GB / ८ GB LPDDR5 रॅम आणि १२८ GB/ २५६ GB स्टोरेजसह येईल. कॅमेराबद्दल बोलायचे झाले तर, यात १२ MP + 12 MP चा रियर कॅमेरा आणि ३२ MP चा फ्रंट कॅमेरा मिळू शकतो.
Google pixel 6 and pro
हा Google फोन ६.४ इंच AMOLED डिस्प्ले, ८ GB रॅम आणि १२८ GB / २५६ GB इंटर्नल स्टोरेजसह येऊ शकतो. ड्युअल सिम आणि इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनरसह येऊ शकतो. Google Pixel 6 आणि Google Pixel 6 Pro मध्ये ५० MP चा रियर कॅमेरा, १२ MP चा अल्ट्रा-वाइड कॅमेरा आणि ८ MP चा फ्रंट कॅमेरा असू शकतो आणि ४,६१४ mAh बॅटरीसह सुसज्ज असू शकतो.
Google Pixel Pro :
६.७१ इंच वक्र पोलेड डिस्प्ले, १२ जीबी रॅम आणि १२८ जीबी /२५६ जीबी/ ५१२ जीबी स्टोरेज आणि अँड्रॉइड १२ सह सुसज्ज असू शकतो. हा फोन ५,००० एमएएच बॅटरी, ५० एमपी मागील कॅमेरा, ४८ एमपी टेलिफोटो कॅमेरा, १२ एमपी अल्ट्रा-वाइड कॅमेरा आणि १२ एमपी फ्रंट कॅमेरासह येऊ शकतो.
Motorola Edge 20 Pro
हा मोटोरोला स्मार्टफोन ६.६७ -इंच FHD + OLED डिस्प्ले, Android ११ आणि १२ GB LPDDR5 रॅम आणि २५६ GB UFS ३.१ स्टोरेजसह येईल. यामध्ये तुम्हाला १०८ MP चा प्राथमिक कॅमेरा आणि ३२ MP चा फ्रंट कॅमेरा मिळेल. तसेच यामध्ये ४, ५००० mAh ची बॅटरी देखील मिळेल.
Oppo A55 4G :
हा Oppo फोन ६.५ इंच IPS LCD स्क्रीन, ५० MP मागील कॅमेरा, १६ MP फ्रंट कॅमेरा आणि Li-Po ५००० mAh बॅटरीसह येऊ शकतो.
Asus 8Z
६४ MP प्राथमिक कॅमेरा आणि १२ MP सेल्फी कॅमेराच्या वैशिष्ट्यांसह सुसज्ज असलेला हा फोन ५.९ इंच FHD + AMOLED डिस्प्ले, ४००० mAh बॅटरी आणि १६ GB LPDDR5 रॅम आणि २५६ GB UFS ३.१ स्टोरेजसह येऊ शकतो. हा 5G स्मार्टफोन आहे.
Realme GT Neo 2 :
हा Realme फोन ६.६२ -इंच फुल HD + १२० Hz E4 AMOLED डिस्प्ले आणि ५००० mAh बॅटरीसह येऊ शकतो. यामध्ये तुम्हाला ६४ MP प्राइमरी कॅमेरा आणि १६ MP फ्रंट कॅमेरा मिळू शकतो.
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3kZamRv