नवी दिल्ली : तुमचे जर पोस्ट ऑफिसमध्ये असल्यास आजपासून जास्त शुल्क द्यावे लागणार आहे. दरमहिन्याला ट्रांझॅक्शनवर खातेधारकांना अधिक शुल्क द्यावे लागेल. आता एटीएम कार्डवरील शुल्क इतर बँकांप्रमाणेच होईल. वाचा: ५ मोफत ट्रांझॅक्शनवर प्रत्येक व्यवहारासाठी १० रुपये आकारले जातील. नॉन-मेट्रो शहरातील खातेधारकांना ८ रुपये द्यावे लागेल. १ ऑक्टोबरपासून पोस्ट ऑफिस एटीएम/डेबिट कार्डसाठी वर्षाला १२५ रुपये + जीएसटी द्यावा लागेल. शुल्क १ ऑक्टोबर २०२१ ते ३० सप्टेंबर २०२२ पर्यंत लागू होतील. एसएमएस अलर्टसाठी देखील इंडिया पोस्ट ग्राहकांकडून १२ रुपये+जीएसटी एवढे शुल्क घेईल. नवीन परिपत्रकानुसार, ग्राहकांनी एटीएम कार्ड हरवल्यास त्यांना एक ऑक्टोबरपासून नवीन कार्डसाठी ३०० रुपये व अतिरिक्त जीएसटी शुल्क द्यावे लागेल. एटीएम पिन विसरल्यास नवीन पिनसाठी ५० रुपये व अतिरिक्त जीएसटी द्यावे लागेल. तसेच, खात्यामध्ये पैसे नसल्यास अशावेळी एटीएम व्यवहार रद्द झाल्यास ग्राहकांना २० रुपये+ जीएसटी शुल्क द्यावे लागेल. ग्राहकांना एटीएमचा वापर केवळ ५ व्यवहारांसाठी करावा लागेल. त्यानंतर प्रत्येक व्यवहारासाठी १० रुपये शुल्क द्यावे लागेल. ग्राहकांना पाच मोफत व्यवहारानंतर बिगर आर्थिक व्यवहारांसाठी ५ रुपये+जीएसटी द्यावा लागेल. प्वाइंट ऑफ सर्व्हिससाठी रोख रक्कमेवर डेबिट कार्डधारकांना रक्कमेच्या १ टक्के शुल्क द्यावे लागेल, जे प्रत्येक व्यवहाराच्या जास्तीत जास्त ५ रुपये असेल. दरम्यान, पोस्ट ऑफिस बचत योजनांतर्गत बचत खाते, रिकरिंग खाते, टाइम डिपॉजिट, मासिक इनकम स्कीम, सीनियर सिटिजन सेव्हिंग स्कीम, पीपीएफ खाते, सुकन्या समृद्धी खाते इत्यादी सुविध उपलब्ध होतात. वाचा: वाचा: वाचा:
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3kY0g3n