Full Width(True/False)

फोटोग्राफी होणार शानदार! १०८ MP कॅमेऱ्यासह आला Motorola चा ‘हा’ शानदार स्मार्टफोन, पाहा किंमत-फीचर्स

नवी दिल्ली : ने भारतात आपला नवीन Motorola Edge 20 Pro ला लाँच केले आहे. या फोनला जागतिक बाजारात जुलै महिन्यात लाँच केले होते. फोनमध्ये १४४ हर्ट्ज रिफ्रेश रेटसह येणारा डिस्प्ले दिला आहे. तसेच स्नॅपड्रॅगन ८७० प्रोसेसर आणि १०८ मेगापिक्सल सेंसर दिला आहे. फोन सेलमध्ये प्री-ऑर्डरसाठी उपलब्ध होईल. वाचा: फोनला मिडनाइट स्काय आणि इरीडीसेंटंट क्लाउड रंगात सादर केले आहे. फोन केवळ ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंटमध्ये येतो. फोनची किंमत ३६,९९९ रुपये आहे. मात्र, ऑफर अंतर्गत ३५,४९९ रुपयात खरेदी करू शकता. फोन खरेदी करताना ICICI आणि Axis बँकेच्या कार्डचा वापर केल्यास १० टक्के इंस्टंट डिस्काउंट मिळेल. Motorola Edge 20 Pro चे फीचर्स: फोनमध्ये ६.७ इंच ओलेड डिस्प्ले दिला असून, हा एचडीआर सपोर्ट, १४४ हर्ट्ज रिफ्रेश रेट आणि कॉर्निंग गोरिल्ला ५ ग्लास प्रोटेक्शनसह येतो. यात Qualcomm Snapdragon 870 SoC चिपसेट दिला आहे. हाच प्रोसेसर OnePlus 9R 5G, Vivo X60 आणि Xiaomi Mi 11X मध्ये देखील मिळतो. यात ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज मिळते. फोन अँड्राइड ओएसवर काम करतो. कंपनीने दोन वर्ष ओएस अपटेडची गॅरेंटी दिली आहे. मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा दिला आहे. याचा प्रायमरी सेंसर १०८ मेगापिक्सल आहे. दुसरा १६ मेगापिक्सल अल्ट्रा वाइड लेंस आणि ८ मेगापिक्सलचा सेंसर आहे. हा ५एक्स हाय-रिझॉल्यूशन ऑप्टिकल झूम आणि ५०एक्स सुपर झूम टेलिफोटो लेंस आहे. रियर कॅमेऱ्याने ८के रिझॉल्यूशनवर व्हीडिओ शूट करू शकता. यात फ्रंटला ३२ मेगापिक्सलचा सेंसर आहे. पॉवरसाठी ३० वॉट TurboPower फास्ट चार्जिंग सपोर्टसह ४५०० एमएएचची बॅटरी दिली आहे. कनेक्टिव्हिटीसाठी ५जी, वाय-फाय ६ दिले आहे. फोन आयपी५२ सर्टिफिकेशनसह येतो. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3B1BtRl