मुंबई : गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या एका क्रूझ शिपमध्ये सुरू असलेल्या रेव्ह पार्टीवर एनसीबीने काल छापा टाकून कारवाई केली. या प्रकरणात आठ जणांना अटक करण्यात आली असून त्यामध्ये बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानच्या मुलाचाही समावेश आहे. त्यामुळे हे प्रकरण माध्यम क्षेत्राने लावून धरल्याने ते चांगलेच तापले आहे. एका वृत्तानुसार नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोच्या अधिकाऱ्यांनी क्रूझवरुन शाहरुखचा मुलगा आर्यन खानला ताब्यात घेऊन इतरांसोबत त्याचीही चाैकशी सुरू केली आहे. शाहरुख खानच्या मुलाचे नाव समोर आल्याने सिनेसृष्टीतील अनेकांच्या प्रतिक्रिया येण्यास सुरूवात झाली आहे. आर्यनवरील कारवाई प्रकरणी अभिनेता सुनिल शेट्टीने देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे. सुनिल शेट्टीने म्हटले आहे की, "जेव्हा कुठे छापा टाकला जातो, तेव्हा काही लोकांना ताब्यात घेतले जाते. अशावेळी आपण हे मानतो की, त्या मुलाने अमली पदार्थांचे सेवन आवश्य केले असेल." सुनिल शेट्टी यांनी पुढे म्हटले आहे की, "मुलाला ताब्यात घेतल्यानंतर एनसीबीकडून त्याची चाैकशी केली जात आहे, मात्र त्या मुलाला श्वास तर घेऊ द्या." एनसीबीने क्रूझवर छापा टाकून केलेल्या कारवाईत एकूण आठ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार क्रूझमध्ये असलेल्यांपैकी बहुतांश लोक हे दिल्लीतील होते. एनसीबीने ताब्यात घेतलेल्यांमध्ये शाहरुख खानच्या मुलासोबतच अन्य व्यक्ती देखील प्रसिद्ध व्यक्तींची मुले व कलाकार असल्याचे समोर आले आहे. यापैकी अभिनेता असलेल्या अरबाज मर्चंटनेच आर्यन खानला या क्रूझवर आणल्याचीही माहिती समोर आली आहे.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3oqfKze