मुंबई : अभिनेत्री आणि तिचा नवरा व उद्योगपती या दोघांनी शर्लिन चोप्राच्या विरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे. शिल्पा आणि राज यांच्या वकीलांना मंगळवारी मुंबई न्यायालयत शर्लिनच्या विरोधात ५० कोटी रुपयांचा दावा ठोठावला आहे. याआधी शर्लिन चोप्राने त्या दोघांवर लावलेल्या आरोपांविरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल करण्याचा इशारा दिला होता. दरम्यान, शर्लिनने राज आणि शिल्पाच्या विरोधात मानसिक आणि लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप करत गुन्हा दाखल केला आहे. शर्लिनने पोलिसांत जी तक्रार दाखल केली आहे त्यामध्ये तिने राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टीवर लावलेले सर्व आरोप हे खोटे, निराधार आणि बिनबुडाचे आहेत. इतकेच नाही तर हे सर्व आरोप पैसे काढण्याच्या हेतूने करण्यात आल्याचा शिल्पा आणि राज यांच्या वकिलांनी दाखल केलेल्या याचिकेमध्ये केला आहे. शिल्पा शेट्टीचे नाव गोवले या याचिकेमध्ये असेही नमूद केले आहे की, जेएल स्ट्रीम अॅपच्या कोणत्याही कामामध्ये शिल्पाचा सहभाग नव्हता. तिचे नाव विनाकारण गोवण्यात आले आहे. जेणेकरून मीडियाचे अटेंशन त्या खटल्याकडे जाईल. शर्लिनच्या विरोधात कारवाई 'शर्लिन चोप्राने भारतीय दंड संहिता कलम ४९९. ५५०, ३८९ आणि १९५ अ अंतर्गंत कारवाई करण्यात आली आहे. भारताच्या न्याय व्यवस्थेवर आमचा विश्वास आहे आणि आम्ही शर्लिनच्या विरोधात कायदेशीर कारवाई सुरू केली आहे. आम्ही त्याच्याविरोधात ५० कोटी रुपयांचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे.' काय होते शर्लिनचे आरोप? पॉर्नोग्राफी प्रकरणात राज कुंद्राला अटक झाल्यानंतर शर्लिनने सोशल मीडिया पोस्टद्वारे अनेक आरोप केले होते. राज कुंद्राने फसवणूक केली असून शारीरिक शोषण केल्याचा आरोप शर्लिनने केला होता. एप्रिल २०२१मध्ये देखील शर्लिनने राज विरोधात पोलिसात तक्रार दाखल केली होती. राज कुंद्रा प्रकरणामध्ये क्राइम ब्रांचने शर्लिनची चौकशी केली होती. या प्रकरणातील ती महत्त्वाची साक्षीदार असल्याचे म्हटले जात होते.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3lV3Yv2