Full Width(True/False)

'भारतीकडे ड्रग्ज सापडूनही जामीन मिळाला, मग आर्यनला का नाही?'

मुंबई- बॉलिवूडचा लोकप्रिय अभिनेता याचा मुलगा याला एनसीबीने ड्रगचं सेवन केल्याप्रकरणी अटक केली होती. अनेकदा सुनावणी होऊनही आर्यनचा जामीन अर्ज फेटाळला जात आहे. त्यामुळे शाहरुखच्या चिंतेत वाढ झाली आहे. त्यामुळे अखेर मुलाला भेटण्यासाठी शाहरुखने आर्थर रोड कारागृहात हजेरी लावली. तर दुसरीकडे आर्यनला जामीन का मंजूर केला जात नाही, असा प्रश्न बॉलिवूड कलाकार विचारत आहेत. स्वयंघोषित चित्रपट समीक्षक कमाल आर खान म्हणजेच यानेही लोकप्रिय विनोदवीर भारती सिंग हिचा दाखला देत न्यायव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उभं केलं आहे. 'रईस' चित्रपटाचे दिग्दर्शक राहूल ढोलकीया यांनी ट्वीट करत म्हटलं, 'हा निर्दयीपणा आहे. तुम्ही म्हणता की त्याच्या फोनमधील चॅटनुसार त्याचे आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेटसोबत संबंध आहेत. पण ज्याला तुम्ही अटक केली त्याच्याकडे तुम्हाला काहीही मिळालं नाही? तुम्ही किती दिवस प्रयत्न करतायत पण तुमच्या हाती काहीच लागत नाही? आर्यन खानला मोकळं करा.' तर केआरकेने न्यायव्यवस्थेवर ताशेरे ओढत म्हटलं, 'आर्यन खानचा जामीन फेटाळला गेला आणि ही सरळसरळ गळचेपी आहे. तुम्ही त्याला मुद्दाम त्रास देताय. शेवटी एक व्यक्ती ज्याने अमली पदार्थांचं सेवन केलं नाही किंवा त्याच्याकडे कोणत्याही प्रकारचे ड्रग मिळाले नाहीत त्याने २० पेक्षा जास्त दिवस तुरुंगात का राहावं?' यानंतर भारतीचं उदाहरण देत केआरके म्हणाला, 'यापूर्वी भारती सिंगला तर लगेच जामीन मंजूर झाला होता. भारती जवळ तर ८६ ग्राम ड्रग मिळाले होते. तरीही तिला जामीन मिळाला आणि आर्यनला मिळत नाही. म्हणजे दोन वेगवेगळ्या व्यक्तींसाठी दोन वेगवेगळे नियम आणि कायदे?' यापूर्वीही केआरकेने आर्यन प्रकरणावर कोणतीही प्रतिक्रिया न देणाऱ्या बॉलिवूड कलाकारांवर रोष व्यक्त केला होता. केआरकेने लिहिलेलं, 'जर बॉलिवूड एक कुटुंब आहे तर त्यांनी आर्यन खानला पाठिंबा दिला पाहिजे. पण इथे तर हृतिक रोशन सोडून दुसरं कुणीचं बोलत नाही.'


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3B1DFrr