Full Width(True/False)

अवघ्या ५ मिनिटात ११७ कोटी रुपयाच्या फोनची विक्री, पहिल्या सेलमध्ये वनप्लसच्या या फोनची जबरदस्त विक्री

नवी दिल्लीः गेल्या आठवड्यात चीनमध्ये आपला नवीन फोन आणला गेला आहे. फोनमध्ये Snapdragon 888 प्रोसेसर, 120Hz रिफ्रेश रेटचा डिस्प्ले आणि ५० मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा सेटअप यासारखे फीचर्स दिले आहेत. १९ ऑक्टोबर रोजी चीनमध्ये या फोनचा पहिला सेल आयोजित करण्यात आला होता. हा सेल सकाळी १० वाजता झाला. अवघ्या ५ मिनिटात OnePlus 9RT ची १०० मिलियन युआन जवळपास ११७ कोटी रुपयाची विक्री झाली आहे. OnePlus 9RT ची किंमत वनप्लस चीनच्या अधिकृत वेबसाइट, Jingdong Mall, Tmall, आणि Suning सारख्या ऑनलाइन प्लॅटफॉर्म्सवर विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आले आहे. नप्लस 9RT च्या 8GB रॅम + 128GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 3,199 युआन (जवळपास ३७ हजार ४०० रुपये), 8GB रॅम + 256GB स्टोरेज मॉडल ची किंमत 3,399 युआन जवळपास ३९ हजार ७०० रुपये आणि 12GB रॅम + 256GB स्टोरेज व्हेरियंटची किंमत 3,699 युआन म्हणजेच ४३ हजार २०० रुपये आहे. या फोनला तीन कलर ऑप्शनमध्ये ब्लॅक, सिल्वर आणि ब्लू या रंगात उपलब्ध करण्यात आले आहे. OnePlus 9RT चे स्पेसिफिकेशंस OnePlus 9RT स्मार्टफोनमध्ये ६.६२ इंचाचा अमोलेड डिस्प्ले दिला आहे. जो पंच होल डिझाइन सोबत येतो. हा डिस्प्ले फुल एचडी प्लस रिझॉल्यूशन 20:9 आस्पेक्ट रेशियो आणि 120Hz रिफ्रेश रेट सपोर्ट करतो. फोनमध्ये १२ जीबी पर्यंत रॅम आणि २५६ जीबी स्टोरेज सोबत Snapdragon 888 प्रोसेसर दिले आहे. सिक्योरिटीसाठी यात इन स्क्रीन फिंगरप्रिंट सेन्सर दिले आहे. फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. रियर कॅमेरा मध्ये OIS- सपोर्ट करणारा 50 मेगापिक्सलचा Sony IMX766 सेंसर, 123-डिग्री फील्ड ऑफ व्यू सोबत १६ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड लेन्स आणि २ मेगापिक्सलचा मायक्रो कॅमेरा मिळतो. सेल्फीसाठी या त १६ मेगापिक्सलचा फ्रंट फेसिंग कॅमेरा दिला आहे. फोनमध्ये ६५ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट सोबत 4,500mAh ची बॅटरी दिली आहे. वाचा: वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2Za0z2X