Full Width(True/False)

जिओ, एअरटेलच्या ग्राहकांमध्ये वाढ, वोडाफोन-आयडियाचे काय झाले?, पाहा डिटेल्स

वृत्तसंस्था, नवी दिल्ली देशातील सर्वात मोठी ठरलेल्या रिलायन्स जिओने यावर्षी ऑगस्ट महिन्यात आपल्या ग्राहकांमध्ये ६.४९ लाखांची भर घातली आहे. याच महिन्यात एअरटेलच्या ग्राहकांमध्ये १.३८ लाखांची भर पडली आहे. दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (ट्राय) बुधवारी ही माहिती प्रसिद्ध केली. जिओ आणि एअरटेल आपल्या ग्राहकांमध्ये अशा तऱ्हेने भर घालत असतानाच व्होडाफोन आयडियाचे ८.३३ लाख ग्राहक ऑगस्टमध्ये सोडून गेले आहेत. जुलैमध्ये हे प्रमाण याहून अधिक होते. जुलैमध्ये व्होडाफोन आयडियाचे एकूण १४.३० लाख ग्राहक सोडून गेले होते. त्यापेक्षा ऑगस्टमधील ग्राहक सोडून जाण्याचे प्रमाण कमी ठरले आहे. टेलिकॉम कंपन्यांची सद्यस्थिती रिलायन्स जिओने ऑगस्टमध्ये ६.४९ लाख नवे ग्राहक जोडले असून कंपनीचे एकूण ग्राहक आता ४४.३८ कोटी झाले आहेत. सुनील मित्तल यांच्या भारती एअरटेलने ऑगस्टमध्ये १.३८ लाख ग्राहकांची भर घातली आहे. त्यामुळे कंपनीची वायरलेस प्रकारातील एकूण ग्राहकसंख्या ३५.४१ कोटी झाली आहे. व्होडाफोन आयडियाचे ८.३३ लाख ग्राहक सोडून गेले आहेत. त्यामुळे कंपनीची एकूण ग्राहकसंख्या घसरून २७.१० कोटींवर आली आहे. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3DYZxpc