Full Width(True/False)

iPhone आणि MacBook साफ करण्यासाठी Apple विकत आहे ‘खास’ कापड, किंमत वाचून थक्क व्हाल

नवी दिल्ली : आज जगातील सर्वात लोकप्रिय आणि मोठा ब्रँड आहे. स्मार्टवॉच, फिटनेस बँडपासून ते लॅपटॉप, स्मार्टफोन सेगमेंटमध्ये Apple ची मक्तेदारी आहे. Apple ला आपल्या प्रोडक्ट्सच्या एक्सक्लूसिव्ह फीचर्ससाठी ओळखले जाते. गॅजेट्सचे फिनिशिंग असो अथवा मेंटनेस, Apple कडून गॅजेट्ससाठी केवळ एक्सक्लूसिव्ह प्रोडक्ट्सचाच वापर केला जातो व याच गोष्टी कंपनीला खास बनवतात. वाचा: Apple चा फोन केवळ अ‍ॅपलच्या चार्जरनेच चार्ज होतो. कंपनीचा केवळ आयफोनलाच कनेक्ट होतो. याच यादीत आता कंपनीच्या नवीन प्रोडक्टचा समावेश झाला आहे. हे प्रोडक्ट अ‍ॅपलचे क्लिनिंग क्लोथ आहे, ज्याचा वापर डिव्हाइस साफ करण्यासाठी केला जातो. Apple चे खास ब्रँडेड कोणत्याही स्क्रॅचशिवाय Apple डिव्हाइसचा डिस्प्ले आणि नॅनो टेक्सचर ग्लासला साफ करते. कंपनीच्या ऑनलाइन स्टोरवर याची किंमत १,९०० रुपये आहे. एका चांगल्या क्वालिटीच्या मायक्रोफायबर कापडाची किंमत जवळपास २०० ते ३०० रुपये असते. मात्र, Apple च्या या स्पेशल पॉलिशिंग क्लोथची किंमत १,९०० रुपये आहे. हे पॉलिशिंग क्लॉथ खूपच मऊ आहे व नॅनो टेक्स्चर ग्लाससह सर्व Apple डिव्हाइसला सुरक्षितरित्या साफ करते. हीच गोष्ट या कापडाला खास बनवते. Apple च्या सिस्टमवरील बाहेरील डिस्प्लेवर एक खास कोटिंग असते, ज्याला नॅनो-टेक्सचर्ड ग्लास म्हटले जाते. या ग्लासवर सहज स्क्रॅच उमटतात. त्यामुळे यासाठी खास क्लिनिंग क्लोथची गरज असते. नॅनो टेक्सचर ग्लाससह Pro Display XDR ची भारतात किंमत ५,२९,९०० रुपये आहे. त्यामुळे याच्या सफाईसाठी १,९०० रुपये खर्च करणे ही मोठी गोष्ट नाही, असे म्हणावे लागेल. मात्र, आणि MacBooks साठी १,९०० रुपये खर्च करणे मोठी गोष्ट आहे. प्रोडक्टच्या किंमतीमुळे चर्चेत येण्याची ही Apple ची पहिली वेळ नाही. याआधी देखील Apple प्रो डिस्प्ले XDR साठी ड्राय पॉलिशिंग क्लोथ आणले होते. याची किंमत देखील चर्चेचा विषय ठरली होती. या पॉलिशिंग क्लोथला Apple च्या प्रोडक्ट्ससोबत बॉक्समध्ये मोफत दिले जावे, अशीही चर्चा आहे. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3C3HyNJ