मुंबई : 'सरदार उधम' सिनेमाचा ट्रेलर गुरुवारी रिलीज झाला. ने यांची भूमिका साकारली आहे. या सिनेमाच्या ट्रेलरमध्ये विकी एका वेगळ्याच अंदाजात दिसला आहे. विकी कौशलच्या 'उरी द सर्जिकल स्ट्राइक' या सिनेमाला मिळालेल्या जबरदस्त यशानंतर हा सिनेमाही हिट होणार अशी शक्यता ट्रेलर पाहून वर्तवली जात आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन शूजित सरका यांनी केले आहे. भारताच्या इतिहासामध्ये सर्वात वेदनादायी घटना म्हणजे जालियनवाला बाग हत्याकांड. या हत्याकांडाचा बदला घेण्यासाठी उधम सिंग लंडनला गेले होते. अशा या क्रांतीकारी व्यक्तीची भूमिका विकी साकारत आहे. या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर विकी कौशलने एका कार्यक्रमामध्ये त्याचे अनुभव सर्वांना सांगितले. त्यात त्याने एक अतिशय मनोरंजक अशी गोष्ट सांगितली. काय म्हणाला विकी कौशल सरदार उधम सिनेमाच्या ट्रेलरमध्ये विकी एका वेगळ्याच अंदाजात दिसत आहे. या ट्रेलरमध्ये विकीच्या चेहऱ्यावर काही खुणा दिसत आहेत. त्याबद्दलचा खुलासा विकीने यावेळी केला. त्याने सांगितले,'सिनेमाचे चित्रीकरण सुरू होण्याआधी मी जखमी झालो होतो. इतका की चेहऱ्यावर १३ टाके घालण्यात आले होते. हा अपघात सरदार उधम सिंग सिनेमाचे चित्रीकरण सुरू होण्याआधी झाला होता. मी तेव्हा एका वेगळ्या सिनेमाचे चित्रीकरण करत होते. चेहऱ्यावर १३ टाके घातल्यानंतर मी स्वतःचा फोटो काढला आणि शूजितदांना पाठवला. कारण चार दिवसांनी या सिनेमाच्या चित्रीकरणाला सुरुवात होणार होती.' फोटो पाहून शूजित म्हणाले... विकीने शूजित सरकार यांना फोटो पाठवल्यावर ते म्हणाले की, 'काही हरकत नाही, तू टाके घालूनच इथे ये.' सिनेमात विकी वेगवेगळ्या लुकमध्ये दिसणार आहे. १६ ऑक्टोबरला हा सिनेमा अॅमेझॉन प्राइम या ओटीटीवर प्रदर्शित केला जाणार आहे.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3urBETE