नवी दिल्लीः फेस्टिव्ह सीजनमध्ये जर तुम्हाला एक नवीन स्मार्ट टीव्ही खरेदी करायचा असेल तर तुमच्यासाठी एक चांगली संधी आहे. शाओमी तुम्हाला एक बेस्ट डील ऑफर करीत आहे. कंपनी आपल्या ४३ इंचाच्या लेटेस्ट ला १० हजार रुपयाच्या बंपर सूट सोबत खरेदी करण्याची संधी देत आहे. या सूट नंतर फुल एचडी स्मार्ट टीव्हीला तुम्ही कंपनीच्या वेबसाइटवरून ३४ हजार ९९९ रुपयाच्या किंमती ऐवजी फक्त २४ हजार ९९९ रुपये किंमतीत खरेदी करू शकता. तसेच, या टीव्हीला खरेदी करताना तुम्ही जर MobiKwik वरून पेमेंट केल्यास तुम्हाला ६०० रुपयाचा कॅशबॅक मिळेल. फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स टीव्हीत कंपनीने 1920x1080 पिक्सल रेजॉलूशन दिले आहे. ४३ इंचाच्या टीव्हीत फुल एचडी डिस्प्ले ऑफर केले आहे. १७८ डिग्री पर्यंत व्ह्यूइंग अँगल सोबत येणाऱ्या शाओमीच्या या स्मार्ट टीव्हीचे रिफ्रेश रेट 60Hz आहे. जबरदस्त पिक्चर क्वॉलिटीसाठी कंपनी टीव्हीत विविड पिक्चर इंजिन टेक्नोलॉजी ऑफर करीत आहे. १ जीबी रॅम आणि ८ जीबीच्या eMMC स्टोरेज च्या या टीव्हीत ६४ बिट क्वॉड कोर प्रोसेसर दिले आहे. ओएस म्हणून हा टीव्ही अँड्रॉयड टीव्ही ९ वर काम करतो. या टीव्हीचे खास वैशिष्ट्ये म्हणजेच यात पॅचवॉल २ सोबत इंटिग्रेटेड IMDb दिले आहे. दमदार साउंडसाठी कंपनी यात २० वॉटचे स्पीकर्स ऑफर करीत आहे. टीव्हीत तुम्हाला गुगल व्हाइस असिस्टेंट आणि बिल्ट इन क्रोमकास्ट सुद्धा मिळणार आहे. कनेक्टिविटीसाठी टीव्हीत वाय फाय आणि ब्लूटूथ ४.२ शिवाय, तीन यूएसबी २.०, तीन HDMI, एक AV, एक इथरनेट आणि एक इयरफोन आउटपुट पोर्ट मिळते. वाचाः वाचाः वाचाः वाचाः
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3D0szUN