Full Width(True/False)

हे तर स्क्रिप्डेट! स्नेहा वाघचा व्हिडिओ पाहून प्रेक्षक संतप्त

मुंबई : छोट्या पडद्यावरील '' हा कार्यक्रम सुरू होऊन आता दोन आठवडे होत आहेत. या कार्यक्रमातील प्रत्येक स्पर्धक बिग बॉसच्या घरात स्वचःचे अस्तित्व टिकून राहण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करताना दिसत आहेत. प्रेक्षक देखील या स्पर्धकांचे प्रयत्न, त्यांचे वागणे- बोलणे काळजीपूर्वक बघत आहेत. जे स्पर्धक आवडत आहेत त्यांना पाठिंबा देत आहेत आणि जे आवडत नाहीत त्यांच्यावर टीकाही करत आहेत. थोडक्यात काय तर प्रेक्षकही हा कार्यक्रम मन लावून पाहत आहेत. परंतु कार्यक्रमातील स्पर्धक स्नेहा वाघने तिच्या इन्स्टाग्राम हँडलवरून एक व्हिडिओ शेअर केला. तो पाहून बिग बॉस मराठी ३ बघणारे प्रेक्षक संतप्त झाले आहेत. प्रेक्षकांनी बिग बॉस मराठी ३ हा कार्यक्रम स्क्रिप्टेड असल्याची टीका करायला सुरुवात केली आहे. काय आहे स्नेहाचा व्हिडिओ बिग बॉस मराठी ३ मधील स्पर्धक हिने काही दिवसांपूर्वी तिच्या इन्स्टाग्रामवरून एक व्हिडिओ शेअर केला. या व्हिडिला स्नेहाने 'गॉसिप अँड किचन फाईट' अशी कॅप्शन दिली असून त्यातून ती बिग बॉसच्या घडामोडी सांगत आहे. परंतु तिने हा व्हिडिओ नेमका कुठे, कधी चित्रीत केला असा प्रश्न प्रेक्षकांच्या मनात आला आहे. तसेच बिग बॉसच्या घरात तिने हा व्हिडिओ कसा काढला? कारण बिग बॉस मराठी ३ कार्यक्रमात सहभागी झालेल्या स्पर्धकांना मोबाईल घेऊन जायला परवानगी नाही. मग असे असताना नेहाने असा व्हिडिओ काढला कसा आणि पोस्ट केला कसा असा प्रश्नही ते विचारत आहेत. स्नेहाचे आणि बिग बॉसच्या घरातील इतर सदस्यांचे सोशल मीडिया अकाउंट हँडल करणारी वेगळी टीम आहे. या सर्व सदस्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरून त्यांचे कार्यक्रमातील व्हिडिओ फोटो अपलोड केले जातात. परंतु स्नेहाच्या अकाऊंटवरून जो व्हिडिओ अपलोड करण्यात आला आहे. तो तिचा एकटीचा आहे. त्यामुळे हा व्हिडिओ पाहून बिग बॉस मराठी ३ हा कार्यक्रम स्क्रिप्टेड असल्याची टीका प्रेक्षकांनी करायला सुरुवात केली आहे. दरम्यान, बिग बॉस मराठी ३ च्या घराच्या दुसऱ्या कॅप्टनची निवड करताना झालेल्या 'हल्ला बोल' टास्कमध्ये जय आणि गायत्रीने आघाडी घेतली. परंतु विकास आणि विशालच्या टीमने दोघांपैकी कुणालाही निवडून दिले नाही. त्यामुळे कॅप्टनशिपचा टास्क रद्द करण्यात आला आणि या आठवड्यात घरातील कामकाज कॅप्टनशिवायच होणार आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3D75PTm