Full Width(True/False)

३ हजारांच्या बजेटमध्ये येतात ‘हे’ शानदार ४जी फोन, पाहा लिस्ट

नवी दिल्ली : आज प्रत्येक फोनमध्ये इंटरनेट असणे गरजेचे आहे. मात्र, बजेट कमी असल्याने अनेकजण २जी खरेदी करतात. या फीचर फोनमध्ये कमी स्पीडसह इंटरनेट वापरावे लागते. मात्र, तुम्ही ३ हजार रुपयांच्या बजेटमध्ये ४जी कनेक्टिव्हिटीसह येणारे फोन खरेदी करू शकता. याशिवाय काही फोनमध्ये वाय-फाय हॉटस्पॉट फीचर देखील मिळते. वाचा: ४जी सपोर्टसह येणारा हा सर्वात स्वस्त ४जी फोन आहे. याची किंमत १,४९९ रुपये आहे. या किंमतीत एका वर्षासाठी मोफत रिचार्ज देखील मिळते. यात अनलिमिटेड कॉलिंग आणि डेटाचा समावेश आहे. फीचर फोनमध्ये २.४ इंच क्यूवीजीए डिस्प्ले दिला आहे. यात १२८ जीबी मायक्रोएसडी कार्ड सपोर्ट करते. यात ३.५ एमएम जॅक आणि बॅक व फ्रंटला ०.३ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. Itel च्या या फोनमध्ये २.४ इंचाचा डिस्प्ले दिला असून, याचे रिझॉल्यूशन २४०x३२० पिक्सल आहे. हा ४जी फोन असून, याच वर्षी लाँच झाला आहे. यात वाय-फाय हॉटस्पॉट फीचर दिले आहे. फोनमध्ये Unisoc T११७ चिपसेटसह ६४ जीबी रॅम आणि १२८ एमबी इंटर्नल स्टोरेज मिळते. यात ६४ जीबी एसडी कार्ड सपोर्ट करते. फोनच्या बॅक फॅनेवर १.३ मेगापिक्सल कॅमेरा दिला आहे. तर पॉवरसाठी १९०० एमएएचची बॅटरी मिळते. यात QWERTY कीपॅड आणि जॉयस्टिक कंट्रोल दिले आहे. फ्लिपकार्टवर फोनची किंमत २,४२५ रुपये आहे. Nokia 110 हा फोन VoLTE सपोर्टसह येतो. यात १२८ एमबी रॅम आणि ४८ एमबी स्टोरेज दिले असून, एसडी कार्डने स्टोरेज ३२ जीबीपर्यंत वाढवू शकता. फोन चारकोल, एक्वा आणि येला या तीन रंगात येतो. यात गेम्स आणि टॉर्च देखील मिळते. बॅक पॅनेलवर कॅमेरा दिला आहे. फोनची किंमत २,७९९ रुपये आहे. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3BuRn72