Full Width(True/False)

स्मार्टफोनसंबंधी या खोट्या गोष्टी, अनेक जण खऱ्या मानतात, ऐकून धक्काच बसेल

नवी दिल्ली : स्मार्टफोनचा वापर आजकाल प्रत्येकजण करत असून स्मार्टफोन्स कुटुंबातील सदस्यासारखे बनले आहे असे म्हटले तर ते चुकीचे ठरणार नाही . प्रत्येक युजर स्वतःच्या स्मार्टफोनची विशेष काळजी देखील घेतो. पण, तुम्हाला माहित आहे का? युजर्समध्ये स्मार्टफोनबद्दल अनेक गैरसमज देखील आहेत. अनेकांना वाटते की, फोनच्या कॅमेऱ्याचे मेगापिक्सल जितके जास्त असतील तितका चांगला फोटो येईल किंवा ऑटो ब्राईटनेसमुळे चार्जिंग लवकर संपेल. या सगळ्या गोष्टींमध्ये किती सत्यता आहे. याबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. जाणून घेऊया स्मार्टफोनबद्दल काही रंजक गोष्टी ज्या खऱ्या नाही. वाचा: स्मार्टफोनची बॅटरी : अनेक लोकांचे म्हणणे आहे की नवीन फोन खरेदी केल्यानंतर, पहिल्यांदा वापरण्यापूर्वी तो पूर्ण चार्ज झाला पाहिजे, अधिक mAh बॅटरी चांगली आहे, बॅटरी पूर्णपणे संपल्यावरच फोन चार्ज केला पाहिजे. मोबाइल तज्ज्ञ बॅटरीबद्दलच्या अशा दाव्यांना खरं मानत नाही. स्मार्टफोनचा कॅमेरा : जेव्हा बहुतेक लोक स्मार्टफोन खरेदी करण्यासाठी जातात, तेव्हा त्यांना सर्वात आधी फोनचा कॅमेरा दिसतो आणि तो किती मेगापिक्सेलचा आहे ते. कारण, अधिक मेगापिक्सेल असलेला कॅमेरा अधिक चांगले फोटो देतो असे अनेकांना वाटते. पण. ते अजिबात खरे नाही. सत्य हे आहे की फोटोची गुणवत्ता मेगापिक्सेल तसेच अॅपर्चरसारख्या गोष्टींवर अवलंबून असते. म्हणून फक्त कॅमेराच्या मेगापिक्सेलसाठी जाऊ नका. स्मार्टफोनची ब्राइटनेस : बर्‍याच लोकांना असेही वाटते की, फोनची ब्राइटनेस ऑटो मोडमध्ये ठेवल्याने बॅटरी लवकर संपते, तर हे खरे नाही. वास्तविक, स्वयं ब्राइटनेस म्हणजे जेव्हा आपण सूर्यप्रकाशात फोन वापरता, तेव्हा ब्राइटनेस आपोआप वाढेल. तर, बरेच लोक असेही म्हणतात की जर फोन रात्रभर चार्जिंगमध्ये राहिला तर बॅटरी लवकर संपते, तर असे अजिबात नाही. सत्य हे आहे की जेव्हा मोबाईल पूर्णपणे चार्ज होतो तेव्हा तो आपोआप चार्जिंग थांबवतो. त्यामुळे काळजी करण्यासारखे काहीच नाही. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3pdtei3