Full Width(True/False)

'खान त्रिकुटा' ची तुलना सैफ अली खानशी, अभिनेता म्हणाला

मुंबई : अभिनेता याने बॉलिवूडमध्ये स्वतःचे असे वेगळे स्थान निर्माण केले आहे. भलेही सैफला बॉलिवूडमधील शाहरुख, सलमान आणि आमिर या तीनही खानांना जेवढी लोकप्रियता, चाहता वर्ग लाभला तेवढा मिळाला नाही. परंतु त्याचे स्वतःचे असे विश्व आहे. या तीनही खानांच्या तुलनेत सैफला लोकप्रियताही तुलनेत उशीराच मिळाली. तसे पाहायला गेले तर सैफने १९९३ मध्ये 'परंपरा' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तोपर्यंत , , शाहरुख खानने मोठ्या पडद्यावर लोकप्रियता मिळवाली होती. सैफला कायमच 'चौथा खान' असाच दर्जा मिळाला. या तीनही खानांशी त्याची कायम तुलना झाली. परंतु या तुलनेमुळे सैफला कधीच फरक पडला नाही. बॉलिवूडमधील या खान त्रयीबद्दल सैफने एका मुलाखतीमध्ये मनमोकळेपणाने त्याची मते मांडली आहेत. सलमान पहिल्यापासूनच... सैफ अली खान याने एका रेडिओला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये बॉलिवूडमधील तीनही खानांची तुलना तू कशी करशील असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर तो म्हणाला, 'सलमान तर त्याच्या पहिल्या सिनेमापासून सुपरस्टार झाला होता. त्यानंतर त्याने कधीच मागे वळून पाहिले नाही. भलेही त्याच्या करिअरमध्ये कितीही चढ- उतार आले तरी सलमान त्याच्याच स्टाईलमध्ये आतापर्यंत चालत आला आहे. त्याची विचार करण्याची वेगळीच पद्धती आहे. त्याच्यासारखा विचार करायला आणि त्याच्यासारखं प्रगल्भ व्हायला होण्यासाठी मला वेळ लागला. तो संपूर्ण सिनेमा स्वतःच्या जोरावर यशस्वी करून दाखवू शकतो.' 'शाहरुख खूप महत्त्वाकांक्षी आहे' शाहरुख बद्दल सैफ म्हणाला, ' शाहरुख खऱ्या अर्थाने बादशहा तर आहेच परंतु तो एक महत्त्वकांक्षी कलाकार आहे. जगाकडे पाहण्याचा त्याच्या स्वतःचा असा वेगळा दृष्टीकोन आहे. त्याच्या तुलनेत मी अगदीच साधा आहे.' शाहरुख आणि सैफने 'कल हो ना हो' या सिनेमात एकत्र काम केले आहे. इतकेच नाही तर त्यांनी अनेक कार्यक्रमाचे एकत्रितपणे सूत्रसंचालनही केले आहे. सिनेमा हा तिघांमधील समान धागा सैफने या मुलाखतीमध्ये सांगितले की, या तीनही सुपरस्टारच्या तुलनेत त्याचा प्रवास तुलनेने खूपच उशीरा सुरू झाला. परंतु त्याला मिळालेले यश आणि या तिघांचे स्टारडम यांची तुलना होऊ शकत नाही. याबाबत सैफने पुढे सांगितले, ' माझे करिअर मी अतिशय सन्मानाने सुरू केले आहे आणि मला त्याचा अभिमान आहे. मला माहिती आहे की मी या तिघांपेक्षा वेगळा आहे. हे तिघे वेगळे असले तरी त्यांच्यात सिनेमा हा एक समान धागा आहे.' आदीपुरुष, बंटी और बबली २ मध्ये दिसणार सैफ सैफ अली खानचा अलिकडेच भूत पुलिस हा सिनेमा रिलीज झाला आहे. त्यामध्ये त्याने अर्जुन कपूरसोबत काम केले होते. हा सिनेमा ओटीटीवर रिलीज झाला होता. सैफच्या आगामी सिनेमांमध्ये आदीपुरुषचा समावेश आहे. त्यामध्ये त्याच्यासोबत प्रभास आणि कृति सेनन दिसणार आहे. तसेच रानी मुखर्जी, सिद्धांत चतुर्वेदीसोबत तो बंटी और बबली २ या सिनेमातही दिसणार आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3kZAZpw