Full Width(True/False)

आर्यन खान प्रकरणी परेश रावल यांचं वक्तव्य चर्चेत, म्हणाले...

मुंबई : अभिनेता आणि गौरी खान यांचा मोठा मुलगा आर्यन खान याला गोव्याला जाणा-या क्रुझवर ड्रग्ज पार्टीमधून अटक करण्यात आली. सध्या आर्यनला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी मिळाली असून त्याला ऑर्थर रोड कारागृहात ठेवले आहे. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने केलेल्या तपासामध्ये ड्रग्ज घेतल्याची कबुली आर्यनने दिली आहे. आर्यनच्या जाणीन अर्जावर २० ऑक्टोबर रोजी सुनावणी होणार आहे. दरम्यान, याप्रकरणी अनेक बॉलिवूडमधील कलाकारांनी आर्यनला पाठिंबा दिला आहे. ज्येष्ठ अभिनेते यांनी देखील याप्रकरणी त्यांची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. काय म्हणाले परेश रावल परेश रावल यांनी नवभारत टाइम्सला दिलेल्या खास मुलाखतीमध्ये सांगितले की, 'आर्यन खान प्रकरणावर नेमके काय झाले हे कुणालाच माहिती नाही. त्यामुळे प्रत्येक जण आपापले अंदाज लावत आहेत. परंतु मी असा कोणताही अंदाज लावणार नाही. याप्रकरणाची चौकशी पूर्ण होऊ देत, त्याचा रिपोर्ट येऊ दे मग त्यावर मत व्यक्त करता येईल. हे प्रकरण म्हणजे राष्ट्रीय पातळीवरील टाईम पास झाला आहे. सुशांत सिंह राजपूत प्रकरणावरून काही सर्कस टीव्हीवरून दाखवण्यात आली. त्यामुळे लॉकडाऊनमध्ये लोकांचे चांगलेच मनोरंजन झाले. त्याचा रिपोर्ट अद्याप आलेला नाही. या सगळ्यामध्ये रिया चक्रवर्तीच्या करीअरची वाट लागली. त्यामुळे आर्यन प्रकरणावर मी सध्या काही मत व्यक्त करणार नाही. जेव्हा रिपोर्ट येईल तेव्हा त्यावर बोलता येईल.' परेश रावल यांनी या मुलाखतीमध्ये पुढे सांगितले की, ' आता मुलांच्या वागण्याचा मुद्दा येतो तेव्हा वडील म्हणून तुम्ही सर्व कर्तव्य पूर्ण करता. परंतु मुलांच्या आयुष्यावर तुमचा कंट्रोल असू शकत नाही. मुलगा जेव्हा मोठा होतो तेव्हा त्याचे आयुष्य असते. जे काही करायचे ते त्याला करायचे असते. त्यामुळे त्याच्यावर तुम्ही कायम लक्ष ठेवू शकत नाही अथवा त्याचे आयुष्य कंट्रोल करू शकत नाही. ते शक्य ही नाही. घरात तुम्ही मुलांवर चांगले संस्कार केले परंतु तो मुलगा बाहेर वाईट संगतीमध्ये रहात असेल तर त्याला तुम्ही काय करू शकता? त्यामुळे कोणतीही कृती करताना मुलांनी शंभरवेळा विचार केला पाहिजे. आपल्या या कृतीमुळे माझ्या आई-वडिलांचे नाव खराब होऊ नये, त्यांची प्रतिमा मलिन होऊ नये याची खबरदारी त्यानेच घ्यायला हवी...'


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3aFUYni